शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021:- दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाला 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर 19 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाने मालिका सुरू होण्यापूर्वीच सराव सुरू केला आहे. दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या सराव सत्रात सहभागी व्हावं लागणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी रिचार्ज करण्यासाठी जोहान्सबर्गमध्ये नॉर्मल ट्रेनिंग घेतलं.

सुमारे 10 तास फ्लाइटमध्ये घालवल्यानंतर, खेळाडू एक दिवस क्वारंटाईनमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांच ट्रेनिंग सुरू झालं. बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये संघाचे खेळाडू भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना दिसत आहेत.

प्रशिक्षण सत्रादरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंनी तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी संपूर्ण नॉर्मल एक्टीव्हीटी देखील केली. यादरम्यान खेळाडूंनी फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळताना दिसून आले.

त्याच्यासोबत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही उपस्थित होते. खेळादरम्यान द्रविड आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीही अनेकदा एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसून आले. दरम्यान, द्रविड आणि कोहलीच्या संघात फुटबॉल चा सामना रंगल्याच पाहायला मिळालं.

भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघातील खेळाडूंनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. यादरम्यान देसाई म्हणाले, ‘आम्ही मुंबईत तीन तास क्वारंटाईनमध्ये होतो आणि त्यानंतर आम्ही सुमारे 10 तास फ्लाइटमध्ये होतो.

येथे पोहोचल्यानंतरही आम्ही क्वारंटाईनमध्ये होतो आणि म्हणून आज संध्याकाळी आम्ही प्रथमच प्रशिक्षण सत्र आयोजित केले, ज्यामध्ये सर्व खेळाडू सहभागी झाले. खेळाडू आता धावण्यापेक्षा कौशल्यावर अधिक भर देतात. येत्या काही दिवसांत प्रशिक्षण सुरू होईल. यामुळे त्याला खेळावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. त्यामुळे खेळाडूंना येथील वातावरण अंगवळणी पडण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *