INS Vikrant : 13 वर्षांची मेहनत, तब्बल 20,000 कोटींचा खर्च, 1600 क्रू मेंबर अन् 31 हेलिकॉप्टरची क्षमता ; पहा, किती आहे पॉवरफुल….
शेतीशिवार टीम : 2 सप्टेंबर 2022 : INS Vikrant : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची युद्धनौका INS विक्रांत नेव्हीत सामील केली आहे. ही एयरक्राफ्ट नौका मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आली आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात एयरक्राफ्ट कॅरियर नौका आहे. भारतापूर्वी केवळ पाच देशांनी 40 हजार टनांपेक्षा जास्त वजनाची एयरक्राफ्ट युद्धनौका तयार केली आहे. INS विक्रांतचे वजन 45,000 टन आहे.
भारतीय नौदलासाठी आजचा दिवस महत्त्वाचा….
शुक्रवार हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज नौदलाला पहिली स्वदेशी एयरक्राफ्ट युद्धनौका आयएनएस (INS Vikrant) मिळाली आहे. आणि ब्रिटीशांच्या काळातील खुणापासूनही मुक्तता मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएनएस विक्रांत देशाला सुपूर्द केली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेल्या ध्वजाचंही मोदींना लोकार्पण केलं. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
केरळमधील कोचीन शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेल्या या विमानवाहू नौकेच्या निर्मितीसाठी 20,000 कोटी रुपये खर्च आला आहे. या जहाजाच्या अधिकृत समावेशामुळे नौदलाची ताकद दुप्पट नक्कीच दुप्पट होणार आहे.
ब्रिटीशांच्या खुणांपासून मिळेल मुक्ती :-
भारतीय नौदल ब्रिटिशांच्या काळातच अस्तित्वात आलं. भारतीय नौदलाच्या सध्याच्या ध्वजावर वरच्या डाव्या कोपर्यात तिरंगा असलेला सेंट जॉर्ज क्रॉस आहे. 2 ऑक्टोबर 1934 रोजी नौदल सेवेचे नाव रॉयल इंडियन नेव्ही असे ठेवण्यात आलं. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक बनल्यानंतर, रॉयल रद्द करण्यात आलं आणि भारतीय नौदलाचे नाव बदलण्यात आले.परंतु, ब्रिटनचा वसाहती ध्वज हटविला गेला नाही. आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला आहे.
INS Vikrant बनवायला लागली तब्बल 13 वर्षे :-
INS Vikrant चं फेब्रुवारी 2009 मध्ये बांधकाम सुरू झालं. ऑगस्ट 2013 मध्ये विक्रांतला पहिल्यांदा पाण्यात उतरवण्यात आले. या एयरक्राफ्ट नौकेच्या बेसिन चाचण्या नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू झाल्या. यानंतर जुलै 2022 मध्ये त्याच्या समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या. चाचणी पूर्ण झाल्यानंतर जुलै 2022 मध्ये कोचीन शिपयार्डने ते नौदलाकडे सुपूर्द केले. ते बनवण्यासाठी 20 हजार कोटी खर्च आला. या जहाजाचे वेगवेगळे भाग 18 राज्यांमध्ये बनवले आहेत. या विमानवाहू नौकेत 76% स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज एखाद्या टाउनशिपइतकी वीज पुरवू शकते.
विशेष दर्जाचे वापरलं स्टील :-
INS Vikrant बनवण्यासाठी 21 हजार टनांहून अधिक स्पेशल ग्रेड स्टीलचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 2,600 किलोमीटरहून अधिक विद्युत केबलचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच 150 किलोमीटरहून अधिक पाइपलाइनही वापरात आणली आहे. त्याची उंची 61.6 मीटर म्हणजेच 15 मजली इमारत आहे. लांबीबद्दल बोलायचे तर ते 262.5 मीटर लांब आहे.
यात 1600 क्रू मेंबर्स आरामात सामावून घेऊ शकतात. या जहाजात 2300 कप्पे बनवण्यात आले आहेत. या जहाजावर MiG-29K लढाऊ विमाने आणि Ka-31 हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत.
अधिकृत माहितीनुसार, या विमानवाहू नौकेच्या निर्मितीमध्ये भारतातील अनेक बड्या औद्योगिक उत्पादकांचा सहभाग होता. यामध्ये भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BEL), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), किर्लोस्कर, L&T (L&T), Keltron, GRSE, Wartsila India आणि इतरांचा समावेश होता. याशिवाय 100 हून अधिक मध्यम आणि लघु उद्योगांनी जहाजावरील स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्रीच्या निर्मितीसाठी मदत केली.
जाणून घ्या – INS विक्रांतची खासियत…
1. कोचीन शिपयार्ड येथे बांधलेल्या INS विक्रांतची लांबी 262 मीटर आहे. तसेच, त्याची रुंदी देखील सुमारे 62 मीटर आहे. ते 59 मीटर उंच आहे आणि 62 मीटरचा बीम आहे. युद्धनौकेमध्ये 14 डेक आणि 2,300 कंपार्टमेंट्स आहेत ज्यामध्ये 1,700 हून अधिक कर्मचारी आहेत. यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन करण्यात आल्या आहेत. याशिवाय, यात ICU पासून वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांशी संबंधित सर्व सेवा आहेत. INS विक्रांतचे वजन सुमारे 40 हजार टन आहे, ज्यामुळे ते भारतात बनवलेल्या इतर जहाजांपेक्षा जड आणि मोठे आहे.
2. INS विक्रांतची खरी ताकद समुद्रात समोर येते, जिथे तिचा कमाल वेग 28 नॉट्स आहे. म्हणजेच ताशी सुमारे 51 किमी. त्याची सामान्य गती 18 नॉट्स पर्यंत म्हणजे 33Km प्रति तास आहे. ही एयरक्राफ्ट कॅरीयर 7500 नॉटिकल मैल म्हणजेच 13,000+ किलोमीटरचे अंतर एकाच वेळी पार करू शकते.