IAS I – Q : सरकारकडे नोटा छापण्याचं मशीन आहे, तर मग जास्तीत – जास्त नोटा छापून गरिबांना वाटायला काय प्रॉब्लेम आहे ?
शेतीशिवार टीम : 2 सप्टेंबर 2022 : कोरोना व्हायरस नंतर देश आणि जग अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील बहुतांश भागात लॉकडाऊन लावण्यात आलं. त्यामुळे लोकांच्या जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये लोक त्यांच्या सरकारांकडून थेट मदत मागत आहेत.
मात्र, सरकारचे हातही बांधलेले आहेत आणि ते एका मर्यादेपर्यंतच मदत पॅकेज देऊ शकतात. अशा स्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, जर प्रत्येक देशाकडे नोटा छापण्यासाठीचे स्वत:चे मशीन आहे, तर मग मोठ्या प्रमाणात नोटा छापून गरीब, वंचित आणि मध्यमवर्गीय लोकांना का वाटत नाही?
तसेच जगातील गरीब देश अधिकाधिक नोटा छापून श्रीमंत का होत नाहीत ? या प्रश्नाचं उत्तर आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया…
समजा एका देशात 10 लोक आहेत आणि प्रत्येक व्यक्तीकडे 100 रुपये आहेत, म्हणजे
10 × 100 = 1000
रुपये आहे आणि त्या देशात खाण्यासाठी 100 किलो तांदूळ आहे.
म्हणजे त्या 100 किलो तांदळाची किंमत 1 हजार रुपये आहे.
आता 100 किलो तांदूळ 1 हजार रुपयांना विकत घेता येऊ शकतं.
जर समजा एखाद्या देशाच्या सरकारने खूप नोटा छापल्या, तर जास्त नोटा छापून काय होऊ शकतं ?
पूर्वी ज्यांच्याकडे 100-100 रुपये होते, आता प्रत्येकाकडे 1000 -1000 रुपये असतील.
म्हणजेच, एकूण लोकसंख्येच्या 1000 × 10 बरोबर 10,000 झाले.
आता यामुळे काय झालं ज्या प्रमाणात पैसे छापले गेले त्या प्रमाणात वस्तूंच्या किमती वाढल्या…
म्हणजे पूर्वी हाच 100 किलो तांदूळ 1000 मध्ये यायचा तोच आता 10,000 रु. झाला.
सरकार जितक्या जास्त नोटा छापेल,
त्या देशात महागाई तितकी जास्त वाढेल, कारण तितका पैसा प्रत्येक व्यक्तीकडे असेल.
त्यामुळे व्यक्तीची परचेसिंग पावर म्हणजेच खरेदी करण्याची क्षमता वाढेल,
त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवांचे दरही वाढतील.
या संपूर्ण स्थितीला आपण महागाई म्हणतो, जी तुम्ही अनेकदा ऐकली असेल अन् आता अनुभवतही असाल
जगात असे दोनच देश आहेत ज्यांनी ही चूक केली आहे, आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.
पहिला देश जर्मनी – जर्मनीने काय केले ?
पहिल्या महायुद्धात ते पराभूत झाले तेव्हा पराभूत झाल्यावर त्यांची अवस्था फार वाईट झाली होती
युद्धाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी अनेक देशांकडून कर्ज घेतले होते.
त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.
त्याने बरेच पैसे एक्स्ट्रा मध्ये छापले जेणेकरून त्याच्या संपूर्ण पैशाचे अवमूल्यन (Money devalued) झाली.
अन् संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली, ज्याचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागला.
दुसरा देश झिम्बाब्वे – झिम्बाब्वेमध्ये काय झालं ? अत्यंत वाईट टप्प्यातून जात असताना त्यांनीही अशा प्रकारे भरपूर पैसे छापले.
तर तेच घडल्यामुळे त्यांच्या चलनाचे मूल्य (Currency Value) खूप कमी झाली आणि रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी
त्यांना ब्रेड, दूध, कडधान्य, भाजीपाला, अशा सर्व जीवनावश्यक करण्यासाठीही त्यांना पैशानी भरलेल्या पिशव्या घेऊन मार्केटमध्ये जावं लागायचं
आणि जो जास्त पैसे देईन त्याला या गाष्टी मिळायच्या. म्हणजे अन्नधान्यासाठी ही त्याठिकाणी बोली लागायच्या…
तर, हेच कारण आहे,
नाहीतर आज प्रत्येक माणूस करोडपती झाला असता.
आणि
कौन बनेगा करोडपती शो बंद झाला असता…