राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जालना ते नांदेड या 180 किलोमीटर अंतराच्या पूरक समृद्धी महामार्गाच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात होणारा आहे. त्यामुळे आता मुंबई ते दिल्लीचा प्रवास सुसाट होण्यासाठी केवळ तीन ते चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरीतच या महामार्गामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीमाल थेट मुंबई, पुणे या बाजारपेठेमध्ये 24 तासांच्या आत पोहोचणार आहे.

राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जालना ते नांदेड या पूरक समृद्धी महामार्गाला मंजुरी मिळाली. या महामार्गासह तत्कालीन सरकारने मंजुरी दिल्यानंतर या महामार्गावर जवळपास 15 हजार रुपये कोटी खर्च होणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या निविदा देण्यात आल्या होत्या.

यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील मंठा, परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूरचा काही भाग व पूर्णा तालुक्यातील, तसेच नांदेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनी संपादन करण्याची प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून सुरू केली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत..

तर काही शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला होता. परंतु त्यांचा नंतर विरोध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात राज्य शासनाच्या भूसंपादन विभागाला यश आले आहे. त्यामुळे आता 180 किलोमीटर अंतराच्या या महामार्गासह प्रत्यक्ष सुरुवात होणार असून मागील तीन ते चार महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने भूसंपादनाचा मोबदला दिला आहे. तर पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास 90 टक्के भूसंपादनास संमती दिल्यामुळे आता या महामार्गाचे काम प्रत्यक्ष दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे. बाहेर राज्यातील कंपन्यांना ही कामे मिळाल्यामुळे सध्या कंपनीच्या वतीने अभियंते, सहाय्यक अभियंते व संबंधित यंत्रणेकडून मजुरांना लागणारी जागा, लागणारे साहित्य व त्यासाठी साठवणूक क्षमता व जमिनीचे उत्खनन यासाठी पूर्णा तालुक्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून महसूल यंत्रणेशी समन्वय साधून आहे. शेतकऱ्यांकडून जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

त्यासाठी पूर्णा शहराजवळील जवळपास 30 ते 40 एकर जमीन संबंधित कंपनीने चार ते पाच वर्षांच्या करारावर संपादित केली आहे. या करारामुळे शहराजवळील काही भागामध्ये – ही मोठी वस्ती वसणार असल्याचे दिसून – येत आहे. एकंदरीतच हा महामार्ग जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसाठी मोठा लाभदायक ठरणार आहे.

या महामार्गामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे, धान्य थेट मुंबईच्या – बाजारपेठेमध्ये जाणार आहे. एकंदरीतच राज्य -सरकारच्या वतीने या महामार्गासाठी मोठा – निधी उपलब्ध करून दिला असून हा महामार्ग – लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत, तर आगामी विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

पूर्णा तालुक्यामध्ये होणार चार मोठे पूल..

जालना ते नांदेड हा समृद्धी महामार्ग पूरक असला तरी या मार्गाची बांधणी जागतिक दर्जाची होणार आहे, यासाठी सध्या दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्णा ते अकोला, पूर्णा ते नांदेड या लोहमार्गावर दोन मोठे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यासोबतच तालुक्यामधून जाणाऱ्या पूर्णा नदी, खडकी नदी या नद्यांवरही दोन मोठे पूल उभारले जाणार आहेत.

जालना – नांदेड या एक्सप्रेस – वेचा संपूर्ण रोडमॅप पाहण्यासाठी

 इथे क्लिक करा  

गौर या ठिकाणी चेंजर पॉईंट..

पूर्णा तालुक्यातील पूर्णा ते नांदेड रस्त्यावरील गौरी या गावाची या समृद्धी महामार्गावर चेंजर पॉईंट म्हणून निवड होणार असून या ठिकाणची जवळपास 20 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या ठिकाणाहून या मार्गावर वाहतुकीसाठी वाहनांना ये-जा करण्यात येणार आहे.

निविदा आणि कंत्राटदार..

MSRDC ने एक्सप्रेसवेच्या नागरी बांधकामासाठी RfQ अर्ज आमंत्रित केले असून 18 बोलीदार त्याच्या बांधकामासाठी पात्र ठरले आहे.

MSRDC ने जानेवारी 2024 मध्ये 6 पॅकेजेसद्वारे त्याच्या बांधकामासाठी बोली आमंत्रित केल्या. एप्रिल 2024 मध्ये आणि आर्थिक बोली मे 2024 मध्ये उघडण्यात आल्या.

पॅकेज (लांबी) आणि चेनेज स्थिती..

JNE-1 (36.09 किमी) : 0.000 ते 36.09 APCO इन्फ्राटेक
JNE-2 (30.46 किमी) : 36.09 ते 66.55 APCO इन्फ्राटेक
JNE-3 (32.44 किमी) : 66.55 ते 98.99 मॉन्टेकार्लो (MCL)
JNE-4 (28.85 किमी) : 98.99 ते 127.84 PNC इन्फ्राटेक
JNE-5 (32.19 किमी) : 127.84 ते 160.03 मॉन्टेकार्लो (MCL)
JNE-6 (19.82+4.48 किमी) : 160.03 ते 179.85 (पॅकेजमध्ये हिंगोले गेट ते छत्रपती चौक या रस्त्याचा समावेश आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *