Small Business Loan : लघु कर्ज मिळवणं होणार सोपं ?
Small Business Loan : कर्ज हा एक प्रकारचा सर्वसामान्य व गरजू व्यक्तींना मिळणारा आर्थिक आधार असून त्यांच्या उन्नतीचा व प्रगतीचा मार्ग आहे. ज्यांना एकाच वेळी मोठी आर्थिक गुंतवणूक करणे शक्य नसते अशा व्यावसायिकांना आपल्या स्वप्नांना बळ देण्यासाठी रिझर्व बँकेचा गाईडलाईन्स प्रमाणे विविध बँका कर्जपुरवठा करत असतात. मात्र हे कर्ज घेताना ज्या प्रक्रियेतून कर्जदाराला जावे लागते त्या अतिशय किचकट व गुंतागुंतीचे असल्यामुळे बहुधा गरजू व्यवसायिक कर्ज प्राप्ती पासून वंचित राहतात.
त्यामुळेच आता रिझर्व बँकेने एक नवीन प्रणाली विकसित करण्यावर भर दिला असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला आहे. ही नवीन प्रणाली लघु कर्ज घेणाऱ्या ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळवणं सोपं जावं फार अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विकसित केली जात असल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितला आहे.
Small Business Loan या प्रणालीचे नाव ULI असं ठेवण्यात आला आहे. सदर प्रणालीचा उद्दिष्ट हे लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करता येणं व गरजूंना सदर कर्जाचा व्यावसायिक विकासासाठी फायदा घेता यावा हे असून या प्रणालीमुळे कर्ज मिळण्याची किचकट प्रक्रिया व अडथळे यांना दूर ठेवत सहज व सोप्या पद्धतीने कर्ज मिळणे शक्य होणार आहे.
सदरची प्रणाली ही भारतासारख्या देशात कर्जपुरवठा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणणे अशी आशा देखील शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. या प्रणालीमुळे कर्ज पुरवठा कामात मोठ्या प्रमाणात सुसूत्रता येईल व कोणीही गरजू कर्जापासून वंचित राहणार नाही असंही त्यांनी म्हटल आहे.
वेळ काळानुसार खरंतर अशा प्रकारचे बदल खूप गरजेचे असल्याने व सदर बदलांबाबत अभ्यास करत त्याची नोंद घेऊन अशा पद्धतीने प्रणाली विकसित करणे हे खरंतर एक आशादायी पाऊल म्हणावे लागेल. UPI च्या जन्मानंतर ज्या पद्धतीने बँकिंग व फायनान्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले व सर्व व्यवहार सोपे व झटपट होऊ लागले त्याचप्रमाणे सदरची प्रणाली देखील कर्जपुरवठा क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणे अशी आशा आता निर्माण झाली आहे.
कर्ज मिळण्याच्या किचकट व वेळ खाऊ प्रक्रियेमुळे बहुतेक गरजू व्यक्ती कर्ज लाभापासून वंचित राहत होते परंतु आता ज्या पद्धतीने ही प्रणाली विकसित केली जात आहे व आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विकसित केली जाणारी प्रणाली ही महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचं बोललं जात आहे. या प्रणालीमुळे लघु व मध्यम व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. Small Business Loan