मनिपूरमध्ये थौबाल जिल्ह्यात दि. ०४/०५/२०२३ रोजी ही घटना घडली व त्यात दोन महिलांची प्रंचड मोठा हिंसाचारी समाज नग्न अवस्थेत धिंड काढीत आहे त्याचा विडिओ दोन महिन्यानंतर समोर आला जामखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी जामखेडचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खूप हळहळ व्यक्त करून व संतापून निवेदन दिले की, आपल्या भारत देशाची ख्याती विविध संस्कृतीने व सौजन्याने नटलेली आहे. त्याचा डंका संपूर्ण जगात गाजत आहे. परंतू मनिपूर राज्यामध्ये मागील काही महिन्यापासून हिंसाचार, अत्याचार व दंगल असे प्रकार चालू आहे. पण त्याठिकाणचे राज्याचे सरकार व भारतीय कायदा सुव्यवस्था संपलेली आहे असे चित्र दिसत आहे. याला जबाबदार कोण…..?
या प्रकरणाचा व्हिडीओ आज अचानक सोशल मिडीया व्हायरल झाला व त्याने संपूर्ण भारत देशाची प्रतिमा धूळीस गेली व लोकशाहीची प्रतिमा ढासळली. आपल्या देशाच्या आदरणीय महामहिम राष्ट्रपती याही एक महिला आहेत.
आज भारत देशात महिलांना देवी माणनारा देश अशी जगात ख्याती असलेला देश पूर्णतः या प्रकरणामुळे बदनाम होत आहे. अशा बदमाश लोकांना कायदा सुव्यस्थेचा व न्याय व्यवस्थेचा कसलाही धाक राहीला नाही याला जबाबदार कोण….?
मनिपूरमध्ये थौबाल जिल्ह्यात दि. ०४/०५/२०२३ रोजी ही घटना घडली व त्यात दोन महिलांची प्रंचड मोठा हिंसाचारी समाज नग्न अवस्थेत धिंड काढीत आहे त्याचा विडिओ दोन महिन्यानंतर समोर आला तेंव्हा माझ्या भारत मातेच्या काळजाला धक्का बसला. महिलांवरील अत्याचार व बलात्कार हे प्रकरण आपल्याही आजूबाजूसहीत संपूर्ण महाराष्ट्र व देशामध्ये घडत आहे याला जबाबदार कोण….?
तसेच लोकशाहीची मूल्य कितपत जिवंत ठेवले आहे हेही त्यातून महत्वाचे दिसत आहे. मनिपूरमध्ये झालेल्या व अमानुष अत्याचार प्रकरणातील सर्वची सर्व नराधमांनी देशाला कलंक लावण्याचा एक इतिहास केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर प्रकरण चालवावे व त्यांनाही भरचौकामध्ये लाईव्ह देशासमोर फाशी देण्यात यावी व मनिपूर राज्य सरकार भारताच्या केंद्र सरकारने तातडीने बरखास्त करावे. जेणेकरून आपली भारत माता मोकळा श्वास घेईल व लोकशाहीच्या मूल्यावर विश्वास राहील. असे निवेदनाद्वारे मागणीकरून निषेध व्यक्त केला आहे.
जय हिंद..