शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : तुम्ही ‘कडकनाथ’ कोंबडीबद्दल ऐकले आहे का ?… नाही, आज आपण ‘कडकनाथ’ कोंबडी कुक्कुटपालनाविषयी जाणून घेणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला ‘कडकनाथ’ कोंबडी कुक्कुटपालन कसे करावे अन् हे कडकनाथ कोंबडी पालन कसं कराव ? कडकनाथ कोंबडीच्या अंड्याचा बाजारातील दर किती आहे ? कडकनाथ कुक्कुटपालनाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

कडकनाथ कोंबडी कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार आहे. स्वाद आणि औषधी गुणधर्मामुळे या कोंबडीला सर्वत्र भरपूर मागणी आहे. आजकाल कडकनाथ हा एक मोठा नफा देणारा व्यवसाय असल्याचे बोलले जात आहे.

याची अनेक कारणे आहेत, एक म्हणजे ते महाग आहे. त्याचा देखभाल खर्च कमी आहे, दुसरे म्हणजे कडकनाथ कोंबडीचं मांस खाल्य्याने अनेक आजारांमध्ये त्याचा फायदा होतो.

चला तर मग आधी कडकनाथ कोंबडीबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये :-

कडकनाथ कोंबडी हि दिसायला अगदी काळा असती. या जातीच्या कोंबडीच स्थानिक नांव “कालामासी” असे आहे त्याचे मांस आणि रक्त देखील काळ्या रंगाचे असते. पण त्याची अंडी सोनेरी रंगाची असतात. यामध्ये प्रोटिन्स चे प्रमाण भरपूर जास्त असते. त्यात कोलेस्टेरॉलची पातळीही खूप कमी असते. फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी याचे मांस खूप फायदेशीर मानलं जातं.

कडकनाथ कुक्कुटपालन कसे करावे :-

तुम्ही देशी कुक्कुटपालनाप्रमाणे कडकनाथ कोंबडीचीही काळजी घेऊ शकता. या कोंबडीला खायला फारसा खर्च येत नाही. हिरवा चारा, बरसीम, बाजरी खाऊनही त्यांची वाढ झपाट्याने होते.

कडकनाथ कोंबडी पिल्लांसाठी, तुम्ही जिल्ह्यातील कोणत्याही प्रगतीशील शेतकरी किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधू शकता. तुम्ही याची सुरुवात किमान 30 पिलांसह करू शकता. जर बजेट थोडे जास्त असेल तर तुम्ही अधिक पिल्ले खरेदी करून आपला व्यवसाय चालू शकता…

तुम्ही कडकनाथ मुर्गी पालन दोन प्रकारे करू शकता :

1) खुले पोल्ट्री फार्म

2) बंद पोल्ट्री फार्म

कडकनाथ कोंबडी कुक्कुटपालनासाठी या गोष्टी लक्षात ठेवा :-

>> कडकनाथ कोंबडी पालनासाठी गाव किंवा शहरापासून थोड्याच अंतरावर पोल्ट्री फार्म उघडा.

>> यासाठी कृषी विज्ञान केंद्र किंवा कोणत्याही पोल्ट्री फार्ममधून प्रशिक्षण घ्यावे.

>>पोल्ट्री फार्ममध्ये फक्त निरोगी पिल्ले ठेवा.

>> थोड्या उंचीवर फॉर्म तयार करा, जेणेकरून पाणी साचणार नाही.

>> शेतात नैसर्गिक प्रकाश व पाण्याची पुरेशी व्यवस्था ठेवावी.

कडकनाथ कोंबडी कुक्कुटपालन योजनासाठी सरकार मदतही करेल :-

तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुम्ही यासाठी ‘कडकनाथ मुर्गी पालन योजने’ची मदत घेऊ शकता. कडकनाथच्या 40 पिलांच्या संगोपनासाठी राज्य सरकार 4400 रुपये अनुदान देते. याचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा.

याशिवाय, तुम्ही सर्व राज्यांमध्ये नॅशनल लाइव्ह स्टॉक मिशन आणि पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड (PVCF) अंतर्गत कर्ज आणि सबसिडीचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सर्वसाधारण वर्गाला 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. बीपीएल आणि SC/S आणि ईशान्येकडील राज्यांतील लोकांसाठी 33 टक्क्यांपर्यंत सबसिडीची तरतूद केलेली आहे.

तसेच NABARD कुक्कुटपाल योजनेअंतर्गत पोल्ट्री फार्म उद्योग वाढविण्यासाठी सरकार कर्ज देते आणि कर्जासोबत सब्सिडी देते. कुक्कुटपालनासाठी सरकार 25% ते 33% पर्यंत सब्सिडी देतात. एससी / एसटी वर्गाच्या लोकांना ही सब्सिडी 35% पर्यंत मिळते.

लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी तसेच पंचायत समिती यांच्याकडे अर्ज उपलब्ध असणार आहे. यांच्या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करायचे जसे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे करावा.

तसेच स्टेट बँकेतर्फे पोल्ट्री फार्मसाठी एकुण 75 टक्के पर्यंत कर्ज देते आणि 5000 कोबंड्याच्या पोल्ट्री फार्मसाठी 3,00,000 रूपये पर्यंत कर्ज एसबीआई देते. एसबीआईने कुक्कुटपालनासाठी कर्ज देणा-या योजनेला ‘ब्रोयलर प्लस योजना’ हे नाव दिलं आहे. येथे आपण 9 लाख रूपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड,
पॅन कार्ड,
ड्राइविंग लाइसेंस,
मतदान कार्ड व
दोन पासपोर्ट साइज फोटो.
रेशन कार्ड,
लाइट बिल,
रहिवासी दाखला
पोल्ट्रीचे प्रकल्प रिपोर्ट

कडकनाथ कोंबडीची किंमत आणि कमाई :-

बॉयलर आणि घरगुती कोंबड्यांच्या तुलनेत त्याची देखभाल करणे सोपे आहे. या कोंबडीला खायला फारसा खर्च येत नाही. बागेत शेड बनवून त्यांचे संगोपन केले तर त्यावर कोणताही खर्च होत नाही.

कमाईबद्दल बोलायचे झाले तर कडकनाथ कोंबडी सोबत तुम्ही कमी खर्चात देशी कोंबडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई करू शकता. बाजारात कडकनाथ पिलांचा दर 70 ते 80 रुपयांपर्यंत आहे. कडकनाथ कोंबडीची किंमत बाजारात 3,000 ते 4,000 रुपये आहे. दुसरीकडे अंड्यांबाबत बोलायचे झाले तर बाजारात कडकनाथ कोंबडीच्या अंड्याचा दर 20 ते 30 रुपये आहे. जर तुम्ही याची सुरुवात फक्त 100 पिल्ले करून केली तर तुम्हाला त्यातून सुमारे 60-70 हजार रुपये मिळू शकतात. अंडी आणि कोंबडी व्यतिरिक्त, आपण त्याचे चिकन(मांस) विकून देखील पैसे कमवू शकता. ही जलद विकणारी जात आहे. बाजारात त्याची किंमत 700 ते 1000 रुपये प्रति किलो आहे.

कडकनाथ कोंबडीचे कुक्कुटपालनाचे फायदे :-

1) कडकनाथ कोंबड्यांना बाजारात मोठी मागणी आहे.
2) इतर कोंबड्यांच्या तुलनेत जास्त प्रतिकारशक्ती.
3) अधिक औषधी गुणधर्म.
4) देखरेख करणे खूप सोपे आहे.
5) या कोंबड्याच्या खाद्यावर जास्त खर्च होत नाही .
6) या कोंबडीचं मांस कर्करोग, मधुमेह, हृदयरोगींसाठी खूप फायदेशीर आहे.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *