शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : PM Kisan Tractor Yojana : केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना राबवत असतात.
PM Kisan योजने अंतर्गतही ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांना शेतीसाठी अनेक प्रकारच्या यंत्रांचीही गरज असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देत आहे. ‘PM Kisan Tractor Yojana’अंतर्गत हे अनुदान दिलं जात आहे. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेउया…
शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाची योजना…
तसं पाहिलं तर सध्याच्या युगात शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी ट्रॅक्टर अत्यंत आवश्यक आहे. पण देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ट्रॅक्टर नसलत्याने त्यांना दुसया कोणाच्या तरी हातपाया पडावं लागतं. अशा भीषण परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने किंवा बैलांचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत (PM Kisan Tractor Yojana Benefits) शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर मिळतो.
50% मिळेल अनुदान :-
केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान (PM Kisan Tractor Yojana) देते. या अंतर्गत शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात. उर्वरित निम्मी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते. याशिवाय राज्य सरकारही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50% अनुदान देतात.
PM किसान ट्रॅक्टर योजनेचे महत्वाचे कागदपत्रे :-
जर तुम्हालाही यामध्ये अर्ज करायचा असेल, तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असली पाहिजेत, तुमच्याकडे यापैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही…
मोबाईल नंबर
अर्जदाराचे आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
शिधापत्रिका
उत्पन्न प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
बँक खाते पासबुक
जमिनीची कागदपत्रे
कसा घ्याल या योजनेचा लाभ अन् अर्ज कसा कराल ?
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल.
येथे तुम्हाला प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेशी संबंधित माहिती मिळवावी लागेल.
आता CSC केंद्र चालकाकडून त्याच्या शेतकरी ट्रॅक्टर योजनेच्या अर्जासाठी काही माहिती आणि कागदपत्रे विचारली जातील.
तुम्हाला अर्जासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे CSC केंद्र ऑपरेटरला द्यावी लागतील.
आता तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल, ज्यामध्ये तुमच्या अर्जाचा पोचपावती क्रमांक टाकला जाईल.
तुम्ही या पावती क्रमांकाद्वारे किसान ट्रॅक्टर योजना अर्जाचे स्टेट्स तुम्ही तपासू शकता.