शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारद्वारे 1 जून 2015 रोजी सुरू केली होती. ज्याचा लाभ भारतातील नागरिक घेऊ शकतात. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून अधिक लोकांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतला होता. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. बी.के. कराड यांच्या मते, 24 जानेवारी 2022 पर्यंत APY अंतर्गत 71,06,743 सदस्य जोडले गेले आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात 79 लाखांहून अधिक ग्राहक या योजनेशी जोडले गेले होते. या योजनेतील एकूण ग्राहकांची संख्या जवळपास 3.75 कोटींच्या वर आहे. तर आत्तापर्यंत 71 लाख लोकं घेतायेत अटल पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत.
या (APY) योजनेंतर्गत, लाभार्थींचे वय आणि गुंतवणूक यानुसार पेन्शनची रक्कम ठरवली जाते तुम्ही कमी रक्कम जमा करून दरमहा अधिक पेन्शन मिळवू शकताच, परंतु अकाली मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबासाठी त्याचा लाभ देखील मिळवू शकता. या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी जसे की लाभ चार्ट, रजिस्ट्रेशन प्रोसेस, पात्रता, आवश्यक कागदपत्रे इ. हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. ..
या योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराला दरमहा प्रीमियम जमा करावा लागेल. त्यानंतर वृद्धापकाळात मासिक पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. अटल पेन्शन योजनेत अर्ज करण्यासाठी लाभार्थींचे वय 18 ते 40 वर्षे असावे, तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर एखाद्या लाभार्थ्याला वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील व्हायचे असेल तर त्याला दरमहा 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल आणि ज्यांचे वय 40 वर्षे असेल त्यांना 297 ते 1,454 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
अटल पेन्शन योजनेंतर्गत गुंतवणूक करून महिन्याला ₹ 10000 मासिक पेन्शन मिळवा..
अटल पेन्शन योजना ही वृद्ध नागरिकांना पेन्शन देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ₹ 1000 ते ₹ 5000 पर्यंतची रक्कम पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते. ही रक्कम लाभार्थ्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर दिली जाते. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना वयाच्या 60 वर्षांनंतर निश्चित पेन्शन मिळू शकेल. या योजनेअंतर्गत पेन्शनची कमाल रक्कम ₹ 5000 आहे. पती आणि पत्नी दोघांनीही स्वतंत्रपणे गुंतवणूक करून या योजनेद्वारे ₹ 10000 पर्यंतची रक्कम मिळवता येते. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून ही माहिती दिली आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत दिली जाते टॅक्स सूट…
असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर अर्जदाराच्या गुंतवणुकीनुसार दरमहा ₹ 1000 ते ₹ 5000 ची पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत ग्राहकांना टॅक्स सूट देखील देण्यात येणार आहेत. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले आहे की,18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व आयकर दाते (Income tax payer) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अटल पेन्शन योजना मुख्य तथ्ये :-
केंद्र सरकारने मे 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.
या योजनेद्वारे तुम्हाला निवृत्तीनंतरही दर महिन्याला पेन्शन मिळू शकते.
ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
ही गुंतवणूक तुम्ही वयाच्या 18 ते वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत करू शकता.
वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनची रक्कम दिली जाते.
या योजनेअंतर्गत 1000, 2000, 3000 आणि 5000 पेन्शन मिळू शकते.
पेन्शनची रक्कम दरमहा भरलेल्या प्रीमियमवर आणि तुम्ही ज्या वयापासून गुंतवणूक सुरू केली त्यावर अवलंबून असते.
तुमचे वय 20 वर्षे असल्यास आणि तुम्हाला ₹ 2000 ची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला दरमहा ₹ 100 चा प्रीमियम भरावा लागेल आणि जर तुम्हाला ₹ 5000 ची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला प्रति महिना ₹ 248 चा प्रीमियम भरावा लागेल.
तुम्ही 35 वर्षांचे असाल आणि तुम्हाला ₹ 2000 ची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला ₹ 362 चा प्रीमियम भरावा लागेल आणि ₹ 5000 ची पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला ₹ 902 चा प्रीमियम भरावा लागेल.
तुमच्या गुंतवणुकीसोबतच या योजनेअंतर्गत 50% रक्कमही सरकार देईल.
जर खातेदाराचे वय 60 वर्षे पूर्ण होण्याआधी निधन झाले तर, खातेदाराच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे बंधनकारक आहे.
अटल पेन्शन योजनेचे फायदे :-
या योजनेचा लाभ फक्त भारतातील लोकच घेऊ शकतात.
अटल पेन्शन योजनेंतर्गत, 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केंद्र सरकारकडून दिली जाईल.
अटल पेन्शन योजनेंतर्गत, लाभार्थींचे वय आणि गुंतवणुकीच्या आधारावर पेन्शनची रक्कम दिली जाईल.
पीएफ (PF) खात्याप्रमाणेच या पेन्शन योजनेतही सरकार आपल्या वतीने योगदान देईल.
जर तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन हवे असेल आणि तुमचे वय 18 वर्षे असेल, तर तुम्हाला 42 वर्षांपर्यंत दरमहा 210 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल.
त्याच वेळी, 40 वर्षे वयाच्या लोकांना 297 रुपये ते 1,454 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतरच तो APY 2022 चा लाभ घेऊ शकेल…
अटल पेन्शन योजनेचा हा चार्ट पहा…
APY Scheme Contribution Chart
| Age of entry | Years of contribution | First Monthly pension of Rs.1000/- | Second Monthly pension of Rs.2000/- | Third Monthly pension of Rs.3000/- | Fourth Monthly pension of Rs.4000/- | Fifth Monthly pension of Rs.5000/- |
| 18 | 42 | 42 | 84 | 126 | 168 | 210 |
| 19 | 41 | 46 | 92 | 138 | 183 | 224 |
| 20 | 40 | 50 | 100 | 150 | 198 | 248 |
| 21 | 39 | 54 | 108 | 162 | 215 | 269 |
| 22 | 38 | 59 | 117 | 177 | 234 | 292 |
| 23 | 37 | 64 | 127 | 192 | 254 | 318 |
| 24 | 36 | 70 | 139 | 208 | 277 | 346 |
| 25 | 35 | 76 | 151 | 226 | 301 | 376 |
| 26 | 34 | 82 | 164 | 246 | 327 | 409 |
| 27 | 33 | 90 | 178 | 268 | 356 | 446 |
| 28 | 32 | 97 | 194 | 292 | 388 | 485 |
| 29 | 31 | 106 | 212 | 318 | 423 | 529 |
| 30 | 30 | 116 | 231 | 347 | 462 | 577 |
| 31 | 29 | 126 | 252 | 379 | 504 | 630 |
| 32 | 28 | 138 | 276 | 414 | 551 | 689 |
| 33 | 27 | 151 | 302 | 453 | 602 | 752 |
| 34 | 26 | 165 | 330 | 495 | 659 | 824 |
| 35 | 25 | 181 | 362 | 543 | 722 | 902 |
| 36 | 24 | 198 | 396 | 594 | 792 | 990 |
| 37 | 23 | 218 | 436 | 654 | 870 | 1087 |
| 38 | 22 | 240 | 480 | 720 | 957 | 1196 |
| 39 | 21 | 264 | 528 | 792 | 1054 | 1318 |
| 40 | 20 | 291 | 582 | 873 | 1164 | 1454 |
अटल पेन्शन योजना (APY) 2022 चे महत्त्वाचे कागदपत्रे :-
अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
बँक खाते असावे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.
आधार कार्ड
मोबाईल नंबर
ओळखपत्र
कायम पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
अटल पेन्शन योजना 2022 साठी अर्ज कसा कराल ?
पंतप्रधान अटल पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या इच्छुक व्यक्तीने प्रथम कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आपलं बचत खातं उघडावे.
त्यानंतर पंतप्रधान अटल पेन्शन योजनेचा अर्ज घ्यावा.
अर्जात मागितलेली सर्व माहिती जसे की नाव, वयाचा दाखला,आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इ. भरा.
अर्ज भरल्यानंतर, तो बँक व्यवस्थापकाकडे सबमिट करा. त्यानंतर, तुमच्या सर्व कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचे बँक खाते अटल पेन्शन योजनेअंतर्गत उघडले जाईल.
| APY Subscriber Registration Form | Click Here |