Take a fresh look at your lifestyle.

Kalyan – Taloja Metro Line 12 : MMRDA कडून 1521 कोटींची निविदा जाहीर, ‘हे’ असणार 17 स्टेशन्स, पहा रूट मॅप..

0

कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (Metro-12) उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे. या मेट्रोची प्रत्यक्ष मार्गिका उभारणी आणि 17 उन्नत स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून 1 हजार 521 कोटींची निविदा जाहीर करण्यात आली असून या प्रोजेक्टसाठी तब्बल 8,416 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करत असून, हा मार्ग आता दृष्टिपथात आला आहे. येत्या 30 महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार असून, लवकरच मेट्रो 12 प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण – तळोजा मेट्रो मार्गाकडे पाहिले जाते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथील एका लोकार्पण कार्यक्रमात कल्याण – तळोजा मेट्रो मार्गाला लवकरच गती प्राप्त होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीतच या मेट्रो मार्गिका आणि मार्गातील 17 स्थानकांच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाच्या 1 हजार 521 कोटींच्या निविदा एमएमआरडीए प्रशासनाने जाहीर केल्या आहेत.

हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. एकूण 20 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून, यात एकूण 17 स्थानके आहेत. या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे.

या मार्गाचे सर्वेक्षण करून त्यासाठीच्या सखोल आरेखन सल्लागार नेमणुकीसाठीच्या निविदा नुकत्याच जाहीरही झाल्या होत्या. या निविदेमुळे या उन्नत मेट्रो मार्गाच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असून येत्या अडीच वर्षाच्या कालावधीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

या स्थानकांचा होणार समावेश :-

कल्याण – तळोजा ( मेट्रो 12 ) अंतर्गत गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजेगाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्व डेपो, पिसावे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश आहे.

लवकरच पायाभरणी कल्याण – तळोजा मेट्रो मार्गिका आणि स्थानकांच्या प्रत्यक्ष बांधकामांच्या निविदा जाहीर झाल्या असून , या प्रकल्पाची पायाभरणी लवकरच होणार आहे . या प्रकल्पामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार असून, निश्चित कालावधीच्या आधीच हा मार्ग पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.