Take a fresh look at your lifestyle.

नाशिक महापालिकेत जम्बो भरतीचा मार्ग मोकळा, अग्निशमन, आरोग्य विभागासह 2800 रिक्त पदांची होणार भरती..

0

अग्निशमन व वैद्यकीय सेवेतील रिक्त पदांची भरती, तर दुसरीकडे राज्य शासनाने रिक्त पदांच्या भरतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सेवा व प्रवेश नियमावली मंजूर करून शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या असताना शासनाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापूर्वी असलेली 35 टक्क्यांची अट एक वेळेसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेत जवळपास 2800 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग यानिमित्ताने मोकळा झाला आहे.

महापालिकेचा ‘ ब ‘ वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला, तरी आस्थापना परिशिष्ट मात्र ‘क’ वर्ग आहे. पालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील 7090 पदे मंजूर असून, त्यातील जवळपास 2800 हून अधिक पदे रिक्त आहेत. मागील 21 वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती झालेली नाही.

‘ब’ संवर्गानुसार शासनाच्या मान्यतेसाठी 14 हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाला सादर केला आहे. परंतु आठ वर्षांत मंजुरी मिळालेली नाही. सध्या उपलब्ध असलेल्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागाच्या 348, वैद्यकीय व आरोग्य विभागातील 358 अशा एकूण 704 पदांच्या भरतीला मान्यता दिली. या भरतीसाठी महापालिकेने आयबीपीएस संस्थेसमवेत कराराची प्रक्रिया सुरू केली आहे, तर अकरा विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळून शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या 11 पदांना मिळाली मंजुरी :- 

अग्निशमन विभाग, वैद्यकीय व आरोग्य विभाग, प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरिक्षण, विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती व तंत्रज्ञान..

Leave A Reply

Your email address will not be published.