Take a fresh look at your lifestyle.

टोयोटा इनोव्हा Hycross च्या किमतीत पहिल्यांदाचं वाढ, आता व्हेरिएंटनुसार मोजावे लागणार इतके जास्त पैसे..

0

जपानची कार निर्माता कंपनी टोयोटाचे (Toyota) अनेक वर्षांपासून भारतीय कार मार्केटमध्ये मोठं वर्चस्व आहे. टोयोटा वाहनांना देशात खूप प्राधान्य दिलं जातं. जर आपण कंपनीच्या देशातील सर्वात लोकप्रिय कारबद्दल बोललो तर, टोयोटा इनोव्हा ही कंपनीची नंबर 1 आणि देशातील सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केट ही जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि इनोव्हा आपल्या स्थापनेपासून देशात खूप लोकप्रिय आहे. इनोव्हाची लोकप्रियता लक्षात घेऊन, कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये देशात टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे न्यू आणि अप टु डेट व्हर्जन लॉन्च केले असून ,यानंतर काही वेळातच त्याचे देशांतर्गत बुकिंगही सुरू झालं. परंतु कमी किमतीत लुकवाईज फॉर्च्युनर सारखी फील देणाऱ्या या SUV च्या किमतीमध्ये प्रथमच कंपनीने किंमतीत वाढ केली आहे.

कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती वाढली ?

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या कोणत्या व्हेरिएंटच्या किंमतीत वाढ झाली आहे ते पाहूया. या कारच्या पेट्रोल आणि हायब्रीड व्हेरिएंटवरच किमतीत वाढ करण्यात आली आहे. या कारच्या सर्व व्हेरिएंटना चांगली मागणी आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस G 7- Seater (Petrol Only) :-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस पूर्वी 18.30 लाख रुपये होती. आता त्याची स्टार्टींग प्राईस 18.55 लाख रुपये झाली आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस G 8-Seater (Petrol Only) :-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस पूर्वी 18.35 लाख रुपये होती. आता त्याची स्टार्टींग प्राईस 18.60 लाख रुपये झाली आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX 7-Seater (Petrol Only) :-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस आधी 19.15 लाख रुपये होती. आता त्याची स्टार्टींग प्राईस 19.40 लाख रुपये झाली आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX 8-Seater (Petrol Only) :-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस आधी 19.20 लाख रुपये होती. आता त्याची स्टार्टींग प्राईस 19.45 लाख रुपये झाली आहे.

Toyota Innova Hycross VX 7-Seater (Strong-Hybrid):-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस पूर्वी 24.01 लाख रुपये होती. आता त्याची सुरुवातीची किंमत 24.76 लाख रुपये झाली आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस VX 8-Seater (Strong-Hybrid) :-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस पूर्वी 24.06 लाख रुपये होती. आता त्याची स्टार्टींग प्राईस 24.81 लाख रुपये झाली आहे.

Toyota Innova Hycross ZX (Strong-Hybrid) :-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस पूर्वी रु. 28.33 लाख होती. आता त्याची स्टार्टींग प्राईस 29.08 लाख रुपये झाली आहे.

Toyota Innova Hycross ZX (O) (Strong-Hybrid) :-

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या या व्हेरिएंटची स्टार्टींग प्राईस पूर्वी रु. 28.97 लाख होती. आता त्याची स्टार्टींग प्राईस 29.72 लाख रुपये झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.