Take a fresh look at your lifestyle.

कांदा चाळ अनुदान योजना : 2022 । नगर जिल्ह्यासाठी 22 कोटी 7 लाख रुपयाचा निधी मंजूर !

0

शेतीशिवार टीम, 27 फेब्रुवारी 2022 : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या कांदा चाळ योजनेसाठी राज्य शासनाकडून 31 जिल्ह्यांसाठी 125 कोटी रुपये त्यातील अहमदनगर जिल्ह्यासाठी 22 कोटी 7 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. येत्या दोन वर्षात 14 हजार 141 कांदाचाळी उभारण्याचे राज्य सरकारने असून राज्यातील कांदा चाळ साठी सर्वाधिक निधी हा अहमदनगर जिल्ह्यासाठी येणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. (Kanda Chal Anudan 2020)  

2019-20 मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कांदाचाळ उभारणी प्रकल्प’ राज्यात राबविण्यासाठीराज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 27 व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली होती.

या प्रकल्पांतर्गत एकूण रू.150 कोटींचा कार्यक्रम राबविण्यात आला असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात 60 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजुर करण्यात आला होता परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षी फारसा निधी मंजूर झालेला नव्हता.

तसेच या योजनेसाठी एकट्या नगर जिल्ह्यातून तब्बल 88 हजार शेतकऱ्यांचे https://mahadbtmahait.gov.in/ या राज्य शासनाच्या पोर्टलवर अर्ज आले होते. त्यामुळे नगर जिल्ह्यात 2021-22 व 2022-23 या दोन वर्षासाठी 2 हजार 523 कांदा चाळी उभारण्याचे लक्ष्य ठेवलं असून जिल्ह्यासाठी तब्बल 22 कोटी 7 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा फलोत्पादन कृषी अधिकारी किरण मोरे यांनी दिली.

उद्देश :-

शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा व्यवस्थित राहून त्याची टिकवण क्षमता काही प्रमाणात वाढवण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचा कांदा साठवून ठेऊन तो चांगल्या किमतीत विकता यावा, कांदा सडण्यापासून त्याचे संरक्षण व्हावं हा यामागचा उद्देश आहे.

अनुदान :-

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कांदा चाळ बांधण्यासाठी सरकारकडून 87 हजार 500 रु. अनुदान मिळतं.

कांदा चाळ उभारल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून पडताळणी केल्यानंतरच अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी कसा घ्यावा….

कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी शेतकऱ्याने किंवा संस्थांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून घेणे गरजेचे आहे.

त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती सादर करावा लागतो.यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत ते आपण पाहू…

1. विहीत नमुन्यातील अर्ज…

2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडाव लागणार आहे.

3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.

4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.

5. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.

6. यापूर्वी कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.

7. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.

8. सदर योजनेतून पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येतो.

पहा, जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती निधी….

पारनेर : 86 लाख 49 हजार 138
नगर : 1 कोटे 4 लाख 35 हजार
राहुरी : 92 लाख 47 हजार 628

राहणीमान : 56 लाख 29 हजार 913
श्रीरामपूर : 97 लाख 56 हजार 333

कोपरगाव : 94 लाख 55 हजार 503
संगमनेर : 1 कोटी 25 लाख 47 हजार 051

अकोले : 1 कोटी 21 लाख 96 हजार 28
जामखेड : 1 कोटी 69 लाख 74 हजार 780 रु

कर्जत : 2 कोटी 95 लाख 25 हजार 381 रु
पाथर्डी : 1 कोटी 44 लाख 36 हजार 292

शेवगाव : 2 कोटी 79 लाख 73 हजार 397
नेवासा : 2 कोटी 47 लाख 41 हजार 014
श्रीगोंदा : 2 कोटी 16 लाख 81 हजार 942 रु

टीप :- ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळ अनुदान योजना : 2022 साठी अर्ज केला असेल किंवा करायचा असेल अशा शेतकऱ्यांनी तालुक्याच्या कृषी अधिकारी ऑफिस व बाजार समितीशी संपर्क साधावा…  

Leave A Reply

Your email address will not be published.