Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan सन्मान निधीबाबत महत्वाचं अपडेट; राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय !

0

शेतीशिवार टीम, 26 फेब्रुवारी 2022 : पी एम किसान सन्मान निधीच्याअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयाचे हप्ते न मिळणाऱ्या याचबरोबर एक दोन-तीन हप्त्याचं वितरण होऊन पुढील हप्ते बंद झालेल्या याच बरोबर शेतकऱ्यांचे हप्ते मिळत आहेत परंतु बँकेचा अकाउंट नंबर चुकीचा मोबाईल नंबर चुकीचा आहे अशा विविध प्रकारच्या दुरुस्ती असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचं आणि मोठं अपडेट आलं असून राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं आहे. PM kisan Samman Nidhi 11 installment 

शेतकरी मित्रांनो,  तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळण्यासाठी तुमच्या खात्याची दुरुस्ती करण्यासाठी सुरुवात होणार असून या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक 22 फेब्रुवारी 2022 रोजी काढण्यात आलेलं आहे

ज्याच्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्याच्या दुरुस्ती, नवीन पात्र झालेले शेतकरी तसेच बोगस अपात्र असलेले शेतकरी याचे फिजिकल व्हेरीफिकेशनही या परिपत्रकामुळे होणार आहे.

पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वी एक-दोन-तीन-चार वितरण झालं होतं परंतु त्यांच्या वेरिफिकेशनच्या नावाखाली किंवा खात्यामध्ये काही दुरुस्ती असल्या कारणामुळे स्टेट लेवल व डिस्टिक लेव्हलवरून हप्ते बंद करण्यात आले होते.

तसेच ऑनलाइन पद्धतीनेही बऱ्याच शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असलं तरी व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे त्यांना अद्याप देखील हप्ते सुरू झालेले नाहीत.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट नंबरच्या व इतर काही माहिती दुरुस्तीचं काम फेब्रुवारी 2020 च्या सुरुवातीपासून हे सर्व कामकाज बंद पडल्याने त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुरुस्त्या झाल्या नव्हत्या लाभार्थ्यांचा नव्याने याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होत नव्हतं.

त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून ऑक्टोबर 2021 मध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी स्पष्ट निर्देश दिले होते की, लाभार्थ्यांच्या दुरुस्त्या करून पूर्वीप्रमाणेच पीएम किसान सम्मान निधि योजना मध्ये महाराष्ट्राचा एक नंबर आणण्याचा प्रयत्न करावा.

परंतु गेल्या पुढील तीन ते चार महिन्याचा कालावधी मध्ये कुठली दुरुस्ती किंवा कुठलेही कामकाज या ठिकाणी सुरू झालं नव्हतं. परंतु आता 22 फेब्रुवारी 2022 रोजी राज्य शासनाने एक महत्वपूर्ण परिपत्रक काढून या सर्व बाबींची दुरुस्ती व अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.

आता दुरुस्तीसाठी होणार गावनिहाय कॅम्पचे आयोजन…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित अर्जांच्या डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी, संबधित शेतकऱ्यांना NIC मार्फत दूरध्वनीद्वारे message ( संदेश ) पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे याबाबत कळविण्यात यावे. तसेच सदर डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी मार्च महिन्यातील चौथ्या शुक्रवारी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन सर्व पात्र लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्त होईपर्यंत करण्यात यावे.

कॅम्पवेळी अर्जदारांना सोबत 7/12 उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याबाबत कळविण्यात यावे. डाटा दुरुस्तीचे काम महसूल, कृषी व ग्राम विकास विभागांच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पाडावे. तसेच याकरिता प्रचार प्रसिध्दी करून कॅम्पचे आयोजन यशस्वी होण्याच्या अनुषंगाने सबंधित जिल्हाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संपूर्ण शासन परिपत्रक लिंकवर क्लिक करून पहा…

 

Leave A Reply

Your email address will not be published.