Take a fresh look at your lifestyle.

लॉन्च होताच Baleno ने टाकलं सगळ्यांनाच मागे ; ‘या’ बाबतीत बनली नंबर 1 कार, पहा डिटेल्स…

0

शेतीशिवार टीम, 25 फेब्रुवारी 2022 : भारतातील सर्वात मोठी Car manufacturer कंपनी मारुती सुझुकीने सर्वात जास्त विक्री होणाऱ्या हॅचबॅक बलेनो (Hatchback Baleno) ची फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केली आहे. ग्राहकांमध्ये या कारची क्रेझ इतकी वादळी ठरली आहे की कंपनीला आतापर्यंत 25000 हजार बुकिंग मिळाले आहेत. याशिवाय या कारने लॉन्च झाल्यानंतर अनेक वाहनांना मागे टाकलं आहे.

असं काय आहे या कारमध्ये, आपण या कारचे फीचर्स, इंजिन आणि किंमतीसह इतर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख जरूर वाचा…

नवीन Balenoने या बाबतीत सर्वांना टाकलं मागे :-   

फ्यूल Efficiency बाबतीत,ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) च्या डेटानुसार, नवीन Balenoचे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्स 22.34kmpl आणि 22.94kmpl मायलेज देतंय. Hyundai i20 च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 20.35kmpl आणि 19.65kmpl आहे.

Tata Altrozच्या मॅन्युअल मॉडेलचे मायलेज 19.05 आहे. फोक्सवॅगन पोलो TSI च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 18.24kmpl आणि 16.47kmpl आहे.आणि Honda Jazz च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 16.6kmpl आणि 17.1kmpl आहे.

या आकडेवारीच्या आधारे, असं देखील म्हणता येईल की, नवीन Baleno ही तिच्या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वात जास्त इंधन competent कार बनली आहे आणि सर्वांना मागे टाकलं आहे.

तसेच या कंपनीने बलेनो (Baleno) फेसलिफ्टसाठी सबस्क्रिप्शन स्कीम देखील सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मंथली फीस 13,999 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये व्हायकल रजिस्ट्रेशन, मेंटनेंस, Insurance आणि रोड साइड असिस्टेंट यांचा समावेश आहे.

इंजिन :-

2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट मायलेज वाढवण्यासाठी स्टार्ट/स्टॉप technology सह नवीन 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह येते. हे सुमारे 88.5 (HP Power) एचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT (AGS) ला जोडलेले आहे. ते 22.94 kmpl पर्यंत मायलेज देण्याचा दावा करते.

फीचर्स :-

नवीन आलेली 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट जबरदस्त फीचर्सनी भरलेली आहे. यात Android Auto, Apple CarPlay आणि 40+कनेक्टेड कार फीचर्ससह नवीन 9.0-इंचाचा SmartPlay Pro+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

इतर काही नवीन हाय-टेक फीचर्समध्ये हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अलेक्सा कनेक्ट, एक ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, मागील एसी व्हेंट्स आणि 6 एअरबॅग्ज, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट इत्यादींचा समावेश आहे. थोडक्यात म्हटलं तर सेफ्टी इक्यूपमेंट्स या कार मध्ये समाविष्ट आहेत.

किंमत :-

मारुती सुझुकी 4 ट्रिम लेव्हलमध्ये नवीन बलेनो (New Baleno) ऑफर करत आहे. ते सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फामध्ये आहेत. नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनोच्या भारतातील फेसलिफ्ट किमत 6.35 लाख ते 9.49 लाख रुपये, (Ex-showroom) आहे. यासाठी बुकिंग आधीच सुरू झाली असून कोणीही 11,000 रुपये टोकन रक्कम भरून हा प्रीमियम हॅचबॅक या वेबसाइट https://www.nexaexperience.com/baleno बुक करू शकतो. त्याची स्पर्धा थेट Hyundai i20, Honda Jazz, Tata Altroz,सोबत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.