शेतीशिवार टीम, 26 फेब्रुवारी 2022 : Kia Motors ने नुकतीच आपली 7 सीटर कार Kia Carens मार्केटमध्ये उतरवली आहे. त्याची किंमत 8.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 16.99 लाख रुपये (Ex-showroom) पर्यंत जाते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वाहनाला आत्तापर्यंत 19 हजारांहून अधिक बुकिंग्स मिळाले असून यातील डिझेल व्हेरियंटसाठी 50% हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. यासोबतच टॉप व्हेरियंट आणि ऑटोमॅटिक व्हर्जनची जोरदार ( 50 टक्क्यांहून अधिक) मागणीही आहे.
49 आठवड्यांपर्यंत करावी लागेल वेटिंग…
Rushlane च्या रिपोर्टनुसार,डीलर्सने म्हटले आहे की नवीन Kia MPV चा वेटिंग पिरियड अनेक भागात 14 ते 49 आठवड्यांपर्यंत वाढला आहे. परंतु, हा वेटिंग पीरियड, व्हेरियंट इंजिन आणि गिअरबॉक्सनुसार बदलतो.
वाहनांचा वेटिंग पिरियड कमी करण्यासाठी कंपनीने मार्चमध्ये उत्पादन अधिक फास्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीपासून सेमीकंडक्टरचा पुरवठा अधिक चांगला होऊ शकतो, असा कंपनीचा विश्वास आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स :-
सर्व-नवीन Kia Carnes पाच ट्रिम्स (प्रीमियम, प्रेस्टिज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस) आणि तीन इंजिन ऑप्शन सह येते. यात 1.5-लिटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल 115hp निर्माण करते, 1.4-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल 140hp आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते जे 115hp उत्पादन करते. तिन्ही 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. टर्बो पेट्रोल मॉडेलमध्ये 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन देखील मिळतो.

फीचर्स :-
विशेष म्हणजे ही 7-सीटर कार आहे, परंतु टॉप लक्झरी प्लस व्हेरियंटमध्ये 6-सीटर ऑप्शन देखील आहे. यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि दुसऱ्या रो – सीटसाठी इलेक्ट्रिक वन-टच-फोल्डिंग फंक्शन मिळते. या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कारप्लेसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, क्रूझ कंट्रोल, 64-कलर अँम्बियंट लाइटिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि सिंगल-पॅन सनरूफ देखील देण्यात आलं आहे.