KDMC Ring Road: कल्याण रिंग रोड अहमदनगर महामार्गाला जोडणार! 33Km चा कसा असणार हा रोड, पहा Road Map..
डोंबिवली, कल्याण, भिवंडी, आंबिवली, टिटवाळा हे पाचही शहरे हे ठाणे जिल्ह्यात येत आहे, तसेच मुंबई कडून दक्षिण – पूर्वेकडे जाण्यासाठी या 5 पैकी कोणत्या ना कोणत्या शहरांमधून जावे लागते. या सगळ्या शहरांलगत रेसिडेन्श्नल आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट समांतर वाढताना दिसून येत आहे. जसे – जसे मुंबई लगतची शहरे मोठं – मोठी होत चालली असून या ठिकाणी कंपन्या, गॊदामे, कारखाने मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने इमारतीचं जाळं निर्माण झालं आहे.
परंतु या वाढत्या शहरीकरणांमुळे ट्राफिकची मोठी समस्यां निर्माण झाली आहे. कारण या शहरांना कनेक्ट करण्यासाठी फक्त फक्त 2 च एक्सप्रेस – वे आहेत. यात पहिला म्हणजे NH160 मुंबई – नाशिक एक्स्प्रेस – वे अन् दुसरा म्हणजे N61 अहमदनगर – कल्याण हायवे त्यामुळे या रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची ये – जा असते. डोंबिवली, कल्याण, भिवंडी, आंबिवली, टिटवाळा या भागातील लोकांना मुंबई – ठाण्यापर्यंत प्रवास करण्यासाठीही मुंबई – नाशिक एक्स्प्रेस – वेवरून जावं लागते. त्यामुळे या ठिकाणी मोठी ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आहे.
या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीए 2014 साली कल्याण ते टिटवाळा पर्यंत 33.30 Km एक नवा रिंग रोड बांधण्याची योजना आखली जो कल्याण – डोंबिवली – टिटवाळाला बायपास करत आहे. हा रिंगरोड 7 टप्प्यात विभागला गेला होता परंतु आता थेट अहमदनगर एक्सप्रेसला हा रिंग रोड जोडण्यासाठी टप्पा 8 हा बनवला जाणार आहे. 1 ते 3 ऱ्या टप्प्यात भूसंपादन सुरु असून 4 ते 7 व्या टप्प्यापर्यंत जवळपास 80 टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. 2025 पर्यंत हा संपूर्ण रिंग रोड प्रवाशांसाठी खुला करण्याची योजना एमएमआरडीएने आखली आहे.
कल्याण रिंग रोड अहमदनगर एक्सप्रेस वेला जोडणार..
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा यासह ग्रामीण भाग जोडण्यासाठी रिंगरोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. या रिंगरोडचा 1.3 Km चा टप्पा 8 हा अहमदनगर एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. रिंग रोड प्रकल्पातील टप्पा 1, 2 आणि 8 ची भूसंपादन प्रक्रिया सुरू करून कामाला गती मिळाली आहे. रिंग रोड प्रकल्पात टप्पा क्रमांक सातनंतर टिटवाळ्याच्या रुंदे येथील रस्ता पुढे टप्पा 8 मध्ये थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडला जाईल, त्यामुळे प्रस्तावित रिंग रोड खऱ्या अर्थाने परिपूर्ण होणार आहे.
कल्याण डोंबिवली रिंग रोडची वैशिष्ट्ये
रूट : टिटवाळा ते डोंबिवली मार्गे आंबिवली आणि कल्याण
लाभदायक प्रदेश : डोंबिवली, काल्या, आंबिवली, टिटवाळा, भिवंडी आणि ठाणे
अंतर : 33.30 किमी
रस्त्याची रुंदी : 30 ते 45 मीटर
विकास प्राधिकरण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)
स्थिती : बांधकामाधीन
प्रकल्पाची अंतिम मुदत : अंशतः सक्रिय + बांधकामाधीन
अंदाजे खर्च: 1425 कोटी
एकूण टप्पे : 7
पहिला टप्पा – काटई नाका ते शिळफाटा
टप्पा 2 – शिळफाटा ते मोठगाव मानखोली रस्ता
टप्पा 3 – मोठगाव मानखोली ते गुरगडी पूल
टप्पा 4 – दुर्गाडी पूल ते गांधारी पूल (बांधकाम चालू)
टप्पा 5 – गांधारी पूल ते मांडा जंक्शन (बांधकाम चालू)
टप्पा 6 – मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन (बांधकाम चालू)
टप्पा 7 – टिटवाळा जंक्शन ते श 30 – श 40 (बांधकाम सुरू)
टप्पा 8 – रुंदे ते गोवेली (अहमदनगर एक्सप्रेसवे ) (बांधकाम सुरू)
कल्याण रिंगरोड : उपनगरीय कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा करणे आणि भविष्यातील वाहतूक आव्हाने सोडवणे
उपयुक्तता :-
टिटवाळा, कल्याण, ठाणे, भिवंडी इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त.
कल्याण आणि डोंबिवली विभागातील शहरांतर्गत वाहतूक कमी करते.
मोठगाव – मानखोली पुलाला (डोंबिवली – ठाणे) जोडलेले आहे.
टिटवाळा आणि चिंचवली मार्गे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या जवळ..