आ. अशोक पवारांच्या पाठपुरवठ्याला यश! पूर्व हवेलीसाठी नवं अप्पर तहसील कार्यालय मंजूर, पहा ‘या’ 3 महसूल मंडळांसह 44 गावांचा समावेश..
पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात हवेली तालुक्याचा विस्तार आहे. तालुक्यातील काही गावांचा समावेश पुणे आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिकांमध्ये होतो. त्यामुळे दैनंदिन वाढते विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास पाहता तालुक्यासाठी सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेली प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.
गेल्या दोन दशकांतील शहरीकरणामुळे हवेली तालुक्याची लोकसंख्या तब्बल 35 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयावरील कामाचा ताण वाढला आहे. या कार्यालयावरील भार कमी करण्यासाठी लोणी काळभोर येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय सुरू करावे अशी मागणी 2015 पासून होत होती. याबाबत शिरूर – हवेली तालुक्याचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सतत विधानसभेत पाठपुरवठा व महसूल विभागाकडे पाठपुरवठा केला होता, आता त्यांच्या मागणीला मोठं यश आलं आहे.
हवेली तालुक्यासाठी नवीन अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होण्याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील हवेली या तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार मोठा आहे. सदर तालुक्याचे वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मौजे लोणी काळभोर येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करुन त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे.
तहसीलदार कार्यालय, हवेली तसेच अपर तहसीलदार कार्यालय, लोणी काळभोर यांच्या कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे महसुली मंडळ व गावे राहतील :-
हवेली तहसील कार्यालय क्षेत्रात खडकवासला, कोथरूड, खेड – शिवापूर, हडपसर, कळस या 5 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला असून 86 महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे.
लोणी काळभोर कार्यालय क्षेत्रात वाघोली, उरळीकांचन, थेऊर या 3 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला असून 44 महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे.
हवेली तालुक्याच्या 35 लाख एवढ्या मोठया लोकसंख्येचा ताण सबंधित अधिकाऱ्यांवर पडत असल्याने हवेली तालुक्यातील नागरिकांची कामे रखडलेली असून महसूल विभागासह इतर विभागांवर कामाचा ताण मोठया प्रामणावर येत असल्याने नवीन अप्पर तहसिल कार्यालयाची अत्यंत आवश्यकता होती.
शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
यापूर्वी 2013 मध्ये पिंपरी चिंचवड करिता अप्पर तहसिल कार्यालय होणेसाठी आपण शासन दरबारी मुद्दा लावून धरला व आपल्या प्रयत्नामुळे तेथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु झाले.हवेली अप्पर तहसिल कार्यालयाचा शासन निर्णय निर्गत झालेला असून सदरचे कार्यालय तत्काळ सुरु होणार असून यापुढे नागरिकांच्या समस्येचे जलदगतीने निराकारण होईल.
हवेली अप्पर तहसिल कार्यालय सुरु होणेसाठी उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री मा.नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मा.श्री.राजेश देशमुख साहेब, जिल्हाधिकारी यांचेकडे वारंवार पाठपुरावा केल्याने याला मुर्त स्वरुप येत आहे व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यानेच हे घडून येत आहे. त्याबद्दल प्रशासन आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो!
ॲड् अशोक पवार, आमदार शिरुर – हवेली