शेतीशिवार टीम, 4 फेब्रुवारी 2022 : Kia India या महिन्यात आपली सर्व-नवीन 6 आणि 7- सीटर MPV लॉन्च करणार आहे. त्यासाठी कंपनीने बुकिंग सुरू केलं आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार अशा सेगमेंटमध्ये आणली जात आहे जिथे स्पर्धा खूप मोठ्या ब्रँड शी होणार आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा (Ertiga) ते इनोव्हा क्रिस्टा (Innova Christa) सारख्या SUV कार्स आहे, जे भारतातील ग्राहकांची पहिली पसंती आहेत. अशा परिस्थितीत या एमपीव्हीच्या (MPV) यशाचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याची किंमत. Kia India कंपनीने ही MPV कमी किमतीत दमदार फीचर्ससह स्पर्धेमध्ये उतरवल्यामुळे सर्वांचीच हवा टाईट होणार आहे.

Carens (कॅरेन्स) हे कंपनीचे भारतातील 4 नंबरचं वाहन…

Kia ने भारतात या कारचे उत्पादन सुरू केलं आहे आणि कंपनीने आंध्र प्रदेशातील आपल्या प्लांटमधून पहिले मॉडेल पाठवलं आहे. Carens हे भारतातील Kia चे चौथे वाहन असणार आहे, कंपनीने देशात आधीच Kia Seltos, Sonnet आणि Carnival ची विक्री केली आहे. Kia Carens चे उत्पादन फक्त भारतात केलं जाणार असून ती तब्बल 80 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.

24 तासात सुमारे 8,000 बुकिंग :-

Kia Motor India ने 14 जानेवारी पासून आगामी Karens MPV चे बुकिंग सुरु केलं आहे आणि कंपनीने सांगितले आहे की, त्याच्या किमती फेब्रुवारी 2022 मध्ये घोषित केल्या जातील. पुढील महिन्यात भारतात येत असलेल्या या कारला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे आणि बुकिंगच्या अवघ्या 24 तासांत सुमारे 8,000 लोकांनी तिची बुकिंग केली आहे.

6 आणि 7 सीटर व्यवस्थेमध्ये येणाऱ्या या MPV ची अंदाजे किंमत 16-18 लाख रुपये आहे. Kia Carens ला स्पर्धेच्या अनुषंगाने किफायतशीर वाहन बनवण्यासाठी कंपनीने त्याच्यासोबत भरमसाठ फीचर्स दिले आहेत.

टर्बो-पेट्रोल इंजिन, पॅडल शिफ्टर्ससह डीसीटी…

Kia Carens सोबत उपलब्ध असलेल्या तीन इंजिन ऑप्शनपैकी सर्वात मजबूत 1.4 -लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 140 हॉर्स पॉवर बनवते. आणि 6-स्पीड मॅन्युअलशी जोडलेल्या 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याचा DCT व्हेरियंट पॅडल शिफ्टर्ससह येत आहे. तुलनेत, हे फीचर्स केवळ महिंद्र मराझोच्या डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, तर Ertiga आणि XL6 चे पेट्रोल व्हेरियंट पॅडल शिफ्टर्ससह येतात. Kia ने केर्न्सला सिंगल-पेन सनरूफ देखील दिलं गेलं आहे.

Kia Carens ला 6 एअरबॅग, पहा फीचर्स :-

केबिनला दोन डिजिटल डिस्प्ले मिळतात. ज्यात 10.25- इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे. हे सिस्टम वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह येतं, दुसरा क्रमांक 12.5-इंच LCD डिजिटल क्लस्टर आहे जे आत्तापर्यँतचं आकाराने सर्वात मोठं आहे.

एमपीव्हीच्या (MPV) केबिनमध्ये प्रवाशांना भरपूर जागा मिळणार आहे. 6 एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, हिल होल्ड असिस्ट, टीपीएमएस आणि डिस्क ब्रेक्स चारही चाकांवर उपलब्ध असणार आहेत. आत्तापर्यंतच्या या सेगमेंटमधील इतर कोणत्याही वाहनात 6 एअरबॅग उपलब्ध नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *