शेतीशिवार टीम, 4 फेब्रुवारी 2022 : अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने (Ultraviolette automotive) अलीकडेच त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक F77 चा टीझर (teaser) व्हिडिओ रिलीज केला आहे, ज्यामध्ये नवीन ई-बाईक (E-bike) दिसत आहे. कंपनीने जारी केलेल्या या टीझरमध्ये असे दिसून आले आहे की, ही मोटरसायकल 2022 च्या वर्षाच्या पहिल्या तीमाहीत लॉन्च केली जाणार असून अल्ट्राव्हायोलेट F77 (Ultraviolette F77) प्रॉडक्शन साठी झाली आहे. 

सुरुवातीला, असा दावा केला जात होता की, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल एका चार्जवर 140 किमी धावू शकते, परंतु Zigwheels च्या एका बातमीनुसार, आता त्याची रेंज आता एका चार्जमध्ये 200 किमी इतकी सांगण्यात आली आहे.

Ultraviolette F77 ग्राहकांना कधी मिळणार ?

अल्ट्राव्हायोलेट इलेक्ट्रॉनिक्स सिटी, बंगलोर येथे प्रॉडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू करणार आहे. ही स्टार्टअप गुंतवणूक F77 इलेक्ट्रिक मोटरसायकलचे प्रॉडक्शन आणि लॉन्चसाठी वापरली जाणार आहे. कंपनी 2022 च्या मध्यापर्यंत मोटारसायकलचा पहिला लॉट बाजारात आणणार आहे. ई-मोटरसायकल लाँच होण्याआधी, कंपनी F77 ला अनेक देशांमधील वेगवेगळ्या रस्त्यांवर चालवण्याचा विचार करत आहे, जेणेकरून तिच्या ड्रायव्हट्रेन, चेसिस आणि बॅटरीची कार्यक्षमता वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर मोजली जाणार आहे.

मोठ्या कंपन्यांनी दाखवला रस….

गेल्या महिन्यातच, कंपनीने भांडवल (Capital) उभारणीसाठी निधी घेण्यास सुरुवात केली आणि टीव्हीएस (TVS) आणि झोहो कॉर्पोरेशन (Zoho Corporation) सारख्या मोठ्या कंपन्यांनी रस दाखवत या कंपनीमध्ये पैसा लावला आहे. हा पैसा F77 इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकच्या प्रॉडक्शनसाठी आणि लॉन्चसाठी वापरला जाणार आहे. कंपनी या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या टेस्टच्या अंतिम टप्प्यात आहे आणि F77 2022 च्या मध्यापर्यंत ग्राहकांना समोर ही बाईक उपलब्ध होणार आहे.

टेस्ट राइड, डिलिव्हरी 2022 मध्येच…

F77 च्या टेस्ट राइड व्यतिरिक्त, 2022 मध्ये ग्राहकांना डिलिव्हरी देण्यात येणार आहे . नारायण सुब्रमण्यम, संस्थापक आणि सीईओ, अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह म्हणाले की, इनोव्हेशन, डिझाइन आणि परफॉमन्स ही बदलाची गुरुकिल्ली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही या सर्व फिचर्स चा आमच्या दुचाकींमध्ये समावेश करू शकतो, जेणेकरून रायडिंगचा अनुभव सर्वोत्तम होईल.

जेव्हा इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देतील, तेव्हाच विद्युत क्रांती सुरू होऊ शकेल. टीव्हीएस (TVS) आणि झोहो कॉर्पोरेशन (Zoho Corporation) या कॉमन इंजिन कंपन्यांनी लवकरात लवकर इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्यासाठी आमच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *