Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांचे विश्वासू सहकारी अपघातातून थोडक्यात बचावले !

0

शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी व बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर हे अपघातातून थोडक्यात बचावले.

किरण गुजर हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीसाठी गेले होते.

काम आटपून बारामतीकडे परतत असताना जेजुरीजवळ समोर चालणाऱ्या एका गाडीला शाळकरी मुले आडवी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांच्या गाडीने समोरील गाडीला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्या, त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. गाडीचा वेग हा मर्यादित होता त्यामुळे देखील फारशी दुखापत झाली नाही. मात्र या अपघातांमध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर अजित पवार यांनी स्वतः तातडीने किरण गुजर यांच्याशी संपर्क साधत त्यांची विचारपूस केली. अपघातात आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन किरण गुजर यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.