शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : मार्केटमध्ये असे बऱ्याच प्रकारचे स्टॉक्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना काही काळातच चांगले रिटर्न्स दिले आहे. जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉक मध्ये अजूनही गुंतवणूक करू शकता. आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स नी गुंतवणूकदारांना भव्य-दिव्य रिटर्न्स दिले आहेत.
पेनी स्टॉक हे असे स्टॉक आहेत,जे खूप स्वस्त असून ज्यांचे मार्केटकॅम्पही कमी असतं. आज आपण येथे रघुवीर सिंथेटिक्स (Raghuvir Synthetics) च्या स्टॉकबद्दल बोलत आहोत.
19 रु.चा स्टॉक ₹494 वर पोहोचला :-
रघुवीर सिंथेटिक्स (Raghuvir Synthetics) च्या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांत त्याच्या गुंतवणूकदारांनी 2,455% रिटर्न्स दिला आहे. हा पेनी स्टॉक यावर्षी 4 जून 2021 रोजी 19.33 रुपयांवर होता, जो सोमवारी BSE वर 52 आठवड्याचा उच्च स्तर 494.05 रुपयांवर पोहचला आहे.
6 महिन्यात केले तब्बल 25 लाख :-
सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आज 25.55 लाख रुपये झाली आहे. मागील 21 सत्रांमध्ये स्मॉल कॅप स्टॉक 177.79% वाढला आहे. शेअर 4.99% वाढीसह 494.05 रुपयांवर उघडला आहे.
रघुवीर सिंथेटिक्सचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेडिंग करत आहे. फर्मचे मार्केट कॅप 1,914 कोटी रुपये झाले. सोमवारी बीएसईवर या फर्मच्या एकूण 5,824 समभागांची 28.77 लाख रुपयांचा व्यवहार चालू आहे.
जाणून घ्या या कंपनीबद्दल…
सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीसाठी, चार प्रमोटरकडे 74.91% भागीदारी किंवा 29.02 लाख शेअर्स आणि 3,831 सार्वजनिक भागधारकांकडे 25.09% भागीदारी किंवा 9.72 लाख शेअर्स आहेत. मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, फर्मने मार्च 2020 आर्थिक वर्षातील 2.48 कोटी रुपयांच्या तुलनेत 5.89 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात 137.50% वाढ नोंदवली.
ही आहेत कंपनी उत्पादने:-
गेल्या सहा महिन्यांत रघुवीर सिंथेटिक्सच्या शेयर्सने मार्केटमध्ये रिटर्न्सच्या बाबतीत आपल्या चढा-ओढ करणाऱ्यांना मागे टाकलं आहे.
रघुवीर सिंथेटिक्स ही सर्वात मोठी कापड प्रक्रिया (टेक्सटाइल प्रोसेसिंग) कंपनी आहे.
कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये बेड लिनन्स / बेडिंग,पडदे,टॉवेल,किचनमधले प्रॉडक्ट,अपहोल्स्ट्री कलर आणि 100% कॉटन पॅच वर्क आणि रजाई यांचा देखील समावेश आहे..