विविध जागतिक संघटनांसह आशिया – पॅसिफिक आर्थिक सहकार्य संघटनेच्या (अपेक) हवामान केंद्राने यंदा मराठवाड्यासह सर्वत्र चांगल्या पावसाळ्याचा अंदाज वर्तवला आहे.

अपेक संघटनेच्या हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जून – 2023 मध्ये प्रशांत महासागरात सक्रिय असलेली एल – निनोची स्थिती सध्या सक्रिय आहे. ला – निनोमुळे मागील वर्षाच्या मोसमी पावसावर विपरीत परिणाम झाला होता. मात्र यंदाचा मोसमी पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे जूनमध्ये एल – निनोची सध्याची स्थिती हळूहळू निवळून मोसमी पावसाला पोषक असलेल्या ‘ला – निना’ची स्थिती निर्माण होईल.

त्यामुळे भारतासह दक्षिण आशियात पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत भारतात चांगल्या सरी कोसळण्याचा अंदाजही अपेकने वर्तवला आहे.

ला – निनाच्या स्थितीमुळे भारतात किमान सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. असे आजवरचे निरीक्षण आहे, असे हवामान तज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी सांगितले.

देशात खरीप लागवडीखालील सरासरी एकूण क्षेत्र 800 लाख हेक्टर आहे. चांगला पाऊस झाल्यास लागवडीत वाढ होते . सन 2020 मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे 2020 च्या खरिपात 882.18 लाख हेक्टरवर लागवड झाली होती. सन 2019 मध्ये 774.38 लाख हेक्टरवर लागवड झाली होती. देशातील खरीप हंगाम पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो.

सन 2018 मध्ये 91 टक्के पाऊस झाला होता आणि अन्नधान्य उत्पादन 285.2 दशलक्ष टन झाले होते. सन 2019 मध्ये 110 टक्के पाऊस झाला होता आणि 29 7.5 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. सन 2022 मध्ये 106 टक्के पाऊस झाल्याने अन्नधान्य उत्पादन 323.5 दशलक्ष टन झाले होते. चांगला पाऊस झाल्यास शेती उत्पादनात चांगली वाढ होते,असे आजवरचे निरीक्षण आहे, असे हवामान तज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी सांगितले.

मौसमी पाऊस ‘लाभ’दायकच..!

देशात खरीप लागवडीखालील सरासरी एकूण क्षेत्र 800 लाख हेक्टर आहे. चांगला पाऊस झाल्यास लागवडीत वाढ होते. सन 2020 मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे 2020 च्या खरिपात 882.18 लाख हेक्टरवर लागवड झाली होती. सन 2019 मध्ये 774.38 लाख हेक्टरवर लागवड झाली होती. देशातील खरीप हंगाम पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो.

सन 2018 मध्ये 91 टक्के पाऊस झाला होता आणि अन्नधान्य उत्पादन 285.2 दशलक्ष टन झाले होते. सन 2019 मध्ये 110 टक्के पाऊस झाला होता आणि 2 97.5 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. सन 2022 मध्ये 106 टक्के पाऊस झाल्याने अन्नधान्य उत्पादन 323.5 दशलक्ष टन झाले होते. चांगला पाऊस झाल्यास शेती उत्पादनात चांगली वाढ होते.

सरासरीपेक्षा अधिक पाऊस ?

प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत भारतात चांगल्या सरी कोसळण्याचा अंदाजही अपेकने वर्तवला आहे. ला – निनाच्या स्थितीमुळे भारतात किमान सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, असे आजवरचे निरीक्षण आहे. सरासरी नियोजित वेळेत समाधानकारक मोसमी पाऊस दाखल झाल्यास पेरणी क्षेत्रात वाढ होते. अन्नधान्याचे मुबलक प्रमाणात उत्पादन होते.

– उदय देवळाणकर, हवामान तज्ज्ञ

एल – निनोचा परिणाम काय ?

मागील वर्षी 2023 च्या जून महिन्यात प्रशांत महासागरात एल – निनोची स्थिती हळूहळू निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. जुलै महिन्यात एल – निनोची तीव्रता वाढली होती. त्याचा परिणाम म्हणून ऑगस्ट आणि त्यानंतर देशातील मोसमी पावसाच्या पर्जन्यवृष्टीवर मोठा परिणाम झाला होता. यापूर्वी 2016 मध्ये एल – निनो सक्रिय झाला होता. हवामान विभागाच्या इतिहासात सन 2016 हे आजवरचे सर्वाधिक उष्णवर्ष म्हणून नोंदवले गेले आहे.

सन 2023 हे वर्षही 2016 नंतरचे उष्ण वर्ष ठरले. एल – निनोचा परिणाम म्हणून दुष्काळी, अतिवृष्टी, तापमानात वाढ असे परिणाम जगभरात दिसून आले. भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. अतिवृष्टी, कमी पाऊस अशा असमान पर्जन्यवृष्टीचा सामना करावा लागला. ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *