शेतीशिवार टीम, 24 डिसेंबर 2021 : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस संपला असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद चांगलाच उफाळून येत आहे. पहिल्या दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली नक्कल त्यानंतर मागितलेली माफी.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची सभागृहात एंट्री होताना आमदार नितेश राणेंनी त्यांची उडवलेली खिल्ली महाराष्ट्रभर व्हायरल झाली.

सोशल मीडियावर पूर्ण दिवस नितेश राणेंनी काढलेला म्यॉव म्यॉव असा आवाज व्हायरल होत होता. आता, राणेंच्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार डॉ. मनिष कायंदे यांनी ट्विट करुन राणेंना टोला लगावला.

‘मांजर आडवं गेले तरी थांबू नये, ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली !”, असे ट्विट कायंदे यांनी केलं. त्यासोबतच, म्याव.. म्याव… हा हॅशटॅगही त्यांनी वापरला.

परंतु आता या वादात राज्याचे अप्लसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खतरनाक रिप्ले दिला आहे. त्यांनी एक ट्विटद्वारे एक कॉक’टेल फोटो शेयर करत आ. नितेश राणे यांची खिल्ली उडवली आहे.

नवाब मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधला. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन ? असा सवाल उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *