शेतीशिवार टीम, 24 डिसेंबर 2021 : Government give 50 thousand rupees to farmers : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केले की, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपयांचे आर्थिक साहाय्य देणार आहे. म्हणजेच वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत सांगितलं की, महात्मा ज्योतिबा फुले कर्ज योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यास सरकार कटिबद्ध आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रश्नाला पवार उत्तर देताना अजित पवारांनी जाहीर केलं.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांना तीन लाखपर्यंत पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा सरकारचा विचार असून त्यासंदर्भात लवकरच कार्यवाही केली जाईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यात प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
का झाला विलंब अन् केव्हा होईल मदत :-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात सांगितलं की, कोरोना साथीच्या आजारानंतर आर्थिक परिस्थितीला फटका बसल्यामुळे मदत देण्यास विलंब झाला.
ते म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे राज्यात 1.5 लाख कोटी रुपयांचा महसूल कमी झाल्याने जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करत आहेत, त्यांना आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मदत दिली जाणार आहे.
सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी !
तत्पूर्वी, राज्य सरकारने आज विधानसभेत सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेच्या कक्षेत आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान या विषयावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत 31.81 लाख शेतकरी पात्र असून आतापर्यंत 20,290 कोटी रुपये देण्यात आले आहेत.