देशातला सर्वात लांब समुद्री पूल महाराष्ट्रात ! मुंबईहून नवी मुंबईला किती वेळात पोहचणार ? पहा Route map..
नवी मुंबई ते मुंबई अंतर कमी करण्यासाठी प्रोजेक्ट तयार करण्यासोबतच, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) रायगड जिल्ह्यातील लॅन्ड पार्सलकडे लक्ष देत आहे. भविष्यात रायगडमधील जमिनीच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता लक्षात घेऊन एमएमआरडीएने रायगडमध्ये स्वत:च्या लॅन्ड पार्सल तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू केलं आहे.
लॅन्ड पार्सल वाढवून, MMRDA त्याच्या चालू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांसाठी निधीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. रायगडमधील जमिनीचे पार्सल वाढवून ते भाड्याने देऊन किंवा कॉम्प्लेक्स विकसित करून एमएमआरडीएला दरमहा मोठे उत्पन्न मिळू शकते. MMRDA ही BKC चे नियोजन प्राधिकरण आहे. बीकेसीमध्ये MMRDA ची सुमारे 35 हेक्टर जमीन आहे. या जमिनीची किंमत अंदाजे 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर MMR मध्ये MMRDA चे सुमारे एक लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट सुरू आहेत.
अशा परिस्थितीत MMRDA जमिनीचे पार्सल वाढवून अतिरिक्त पैशांची व्यवस्था करण्याच्या योजनेवर काम करत आहे. शिवडी – न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) पुढील वर्षी पूर्ण होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमटीएचएल कॅम्पसजवळील जमिनींच्या किमती वाढतील. एमटीएचएलच्या दुसऱ्या भागात नवीन शहर आणि नवीन उद्योग विकसित करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.
मुंबईबाहेर लॅन्ड पार्सल तयार करण्यासाठी, एमएमआरडीएने नवी मुंबईच्या दिशेने सुरू होणाऱ्या एमटीएचएलजवळील कॉम्प्लेक्ससाठी एमएमआरडीएला नियोजन प्राधिकरण बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. मुंबईतील शिवडीपासून सुरू होणारी MTHL रायगड जिल्ह्यात संपते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय ?
MMRDAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएने नवीन नियोजन प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. नवीन शहर विकास प्राधिकरण एमएमआरडीए अंतर्गत काम करेल. या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घ्यायचा आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावाला येत्या काही दिवसांत सरकारकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीएला सध्या सुरू असलेला प्रकल्प आणि प्रस्तावित प्रकल्पाला लागून असलेल्या परिसराचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास करणे शक्य होणार आहे..
सध्या नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका आणि सिडको या संकुलाच्या विकासाची आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. एमएमआरडीएच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर रायगड जिल्ह्य़ातील कोणता भाग एमएमआरडीए आणि सिडकोच्या विकासाची जबाबदारी घेणार हे निश्चित होणार आहे.
अनेक प्रोजेक्ट्सची कामे सुरु..
मुंबईत जागेच्या कमतरतेनंतर सरकार नवी मुंबईत अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. याअंतर्गत नवी मुंबईत विमानतळ बांधण्यात येत आहे. विमानतळाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणे अपेक्षित आहे. MTHL 22 किलोमीटर लांबीच्या या पुलाच्या बांधकामानंतर मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापले जाणार आहे. पुढे मुंबई – पुणे एक्स्प्रेसला जोडण्यासाठी 4.5 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधला जाणार आहे.
हा एलिव्हेटेड रोड (MTHL) आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या चिर्ले इंटरचेंज दरम्यान असणार आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीमुळे मुंबईतील शिवडी येथून वाहने न थांबता थेट मुंबई – पुणे एक्सप्रेस – वेवर येऊ शकतील. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे दरम्यान सिग्नल फ्री डिमांड उपलब्ध होईल. तसेच विरार-अलिबाग कॉरिडॉरही रायगडमधून जाणार आहे.