खरीप हंगामातील पैशाचे शेतकऱ्यांना मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. चालू वर्षी मोठ्या अडचणीतून सोयाबीनचे उत्पन्न घ्यावे लागले. सुरवातीला एक महिना उशिरा पावसाने हजेरी लावली. हंगामाच्या सुरुवातीपासून निसर्गाची अवकृपा तसेच रोगराईचा मोठा प्रादुर्भाव असे एकापाठोपाठ एक संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले.
सोयाबीन हंगाम संपून दोन ते तीन महिने उलटले तरी सोयाबीनला योग्य भाव नाही हंगामाच्या सुरुवातीपासून म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहा फँटला 4 हजार 500 रुपये दर स्थिर होता. नोव्हेंबर महिन्यात 5 हजार 100 ते 5 हजार 200 वर दरवाढीचा चढ – उतार होताना दिसत आहे. हंगाम संपल्यानंतर तरी 5 हजारावर दर जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती पण झाले उलटेच डिसेंबरअखेर सोयाबीनला 4 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल दर स्थिरावला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे .
आज नाही तर उद्या भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी सलग दोन वर्षांचं सोयाबीन घरात साठवून ठेवलं आहे, पण झाले उलटेच, अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाव वाढीच्या आशेची राख रांगोळी झाली. चार वर्षापूर्वी सोयाबीनचा प्रतिक्विटल भाव 11 हजाराच्यावर गेला होता. तेव्हा विकायला फारसे सोयाबीन नव्हते.
शेंगा भरण्याआधी येलो मॅजिकचा हल्ला..
सोयाबीन पिकांच्या शेंगा भरण्याआधी येलो मॅजिक रोगाचा प्रादुर्भाव इतक्या मोठया प्रमाणात झाला की एक दोन दिवसात सर्व सोयाबीन पिवळं धमक दिसू लागलं. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून निसर्गाची अवकृपा तसेच रोगराईचा मोठा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनला एकरी तीन ते चार क्विंटलपेक्षा उतारा कमी मिळाला. यंदा सोयाबीन पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च देखील वसूल झाला नाही.
लष्कर अळीने शेकडो हेक्टर सोयाबीन उद्ध्वस्त. .
यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनपूर्व पावसाने जवळपास एक महिना उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरण्यांना विलंब झाला. सुरवातीपासून कमी पाऊस, ऐन फुलोऱ्याच्या वेळी पावसाची दीर्घकाळ उघडीप तर, लष्करी अळीने सोयाबीनची पाने खाऊन सोयाबीन फस्त केलं. लष्कर अळीचा प्रादुर्भाव इतका भयानक होता की, एका रात्रीत शेकडो हेक्टर पीके नष्ट केली. लष्कर अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणीचा प्रयत्न करूनही शेतकऱ्यांना अपयश आले.
पहा, आजचे काय आहे बाजारभाव..