शेतीशिवार टीम : 6 जुलै 2022 :- LPG Cylinder Price Hike : देशात सतत वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती वाढल्या आहेत. ही वाढ 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरवर करण्यात आली आहे. त्यांच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

आता राज्याची राजधानी मुंबईत घरगुती एलपीजी (LPG Cylinder) सिलिंडरसाठी आता 1053 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय 5 किलोच्या छोट्या घरगुती सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. या वाढीनंतर अहमदनगर – पुण्यामध्ये मध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1057 रुपयांचा झाला असून गॅस सिलिंडर एजन्स्या अधिक चार्ज म्हणून 30 ते 40 रुपयांचा दार आकारतात त्यामुळे आता गॅस सिलिंडरचा दर 1100 वर जाऊन ठेपला आहे.

घरगुती सिलिंडरच्या दरात झाली 50 रुपयांनी वाढ :-

घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Price) 50 रुपयांनी वाढली आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरसोबतच 5 किलोच्या छोट्या घरगुती सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर 18 रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर 8.50 रुपयांनी कमी झाली आहे.

व्यावसायिक सिलिंडरचे घटले होते दर.. 

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरच्या (Commercial cylinder) किमती 198 रुपयांनी कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. त्या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2021 रुपयांवर गेली होती. पण आता 8.50 रुपयांच्या आणखी कपातीसह किंमत 2012 रुपयांच्या जवळ येईल.

पहा, तुमच्या शहरातील LPG सिलिंडरचे दर…

शहराचे नाव LPG सिलिंडरचे दर
दिल्ली  1053
मुंबई 1053
कोलकाता 1079
चेन्नई 1069
जयपुर 1057
लखनऊ 1091
अहमदाबाद 1060
पटना 1143
इंदौर 1081
पुणे 1056
गोरखपुर 1062
भोपाल 1059
आगरा 1066

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *