Take a fresh look at your lifestyle.

Mahadbt Scheme : शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! शेतकरी योजनेची व्हेबसाइट बंद, आता ‘ही’ आहे नवी व्हेबसाइट, पहा लिंक..

0

शेतकरी योजना, पोस्ट मेट्रीक शिष्यवृत्ती इतर सरकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी आता नवीन वेबसाइट नवीन संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे. Mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळ आता बंद झालं आहे.

गेल्या काही दिवसापासून महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात Mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळावर अनेक समस्या येत होत्या, शेतकऱ्यांना या व्हेबसाइटवर लॉगीन करता येत नव्हतं, हे संकेतस्थळही खोलता येत नव्हतं, तसेच अर्ज भरताना व्हेबसाइट कधीकधी एक्झिट असकल्याने पेमेंट कंप्लिट होत नव्हतं, अशा सर्व परिस्थितीमध्ये अनेक समस्या शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना येत होत्या.

या व्हेबसाइटचे सेक्युरिटी सर्टिफिकेटही एक्स्पायर झालं होतं, त्यामुळे वेबसाईट खोलतानासुद्धा अनसेफ कंडिशनमध्ये ओपन होत होती. त्यामुळे हे संकेतस्थळ बदलण्यात आले असून आता शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in हे नवीन संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे.

महा DBT शेतकरी योजना उद्देश्य :-

महा DBT शेतकरी पोर्टल योजनेचा उद्देश त्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्र शिकण्यासाठी सवलतीच्या दरात शेतीमध्ये वापरलेली उपकरणे खरेदी करता येणार आहेत.

सरकार SC आणि ST शेतकऱ्यांना 50% आणि राज्यातील इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळते.

अनुदानामुळे शेतकऱ्याला अधिक प्रभावीपणे शेती करण्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी करता येतात.

शेतकऱ्याकडे असलेल्या अवजारांचा वापर करून ते आपले पीक अधिक प्रमाणात वाढवू शकतात.

काही शेतकरी खराब हवामानामुळे त्यांचे बरेचसे पीक गमावतात, परंतु जे इतके समृद्ध नसतात त्यांच्यामुळे बरेचदा नुकसान होते. अडचणीमुळे शेतकऱ्याला चांगले पीक घेण्यास अडचण येत आहे.

राज्य सरकार महा DBT शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध फायदे उपलब्ध करून देत आहे जेणेकरून ते त्यांचे कृषी उत्पादन वाढवू शकतील…

नव्या व्हेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.