लॉन्च होण्यापूर्वीचं या SUV चा धुमाकूळ, रोज मिळत आहे 1000 बुकिंग, ज्यादा स्पेस, जबरदस्त K15B इंजिन, 6 एयरबॅग, किंमत फक्त..
यावर्षी मारुती सुझुकी कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार असे दिसत आहे. मारुती सुझुकी या वर्षी शेवटी मारुती फ्रॉन्क्स (Fronx) आणि जिमनी (Jimny) या SUV लॉन्च करण्याच्या विचारात आहे. भारतातील या सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीला मारुती फ्रॉन्क्स आणि जिमनी लॉन्च झाल्यापासून विक्रमी संख्येने बुकिंग मिळत आहे.
फ्रॉन्क्स आणि जिमनी या दोन्ही SUV चे 11 जानेवारी रोजी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अधिकृतपणे अनावरण करण्यात आले होते, तेव्हापासून जिमनीने 10,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे, तर Fronx ला गेल्या काही आठवड्यांमध्ये सुमारे 4,000 बुकिंग मिळाले आहेत. या दोन्ही SUV भारतातील SUV उत्पादकांमध्ये मारुती सुझुकीचे स्थान मजबूत करतील असं म्हटलं जात आहे. मारुती सुझुकीच्या जेन ब्रेझा आणि ग्रँड विटारा सारख्या लोकप्रिय एसयूव्ही आधीच ग्राहकांच्या मनात घर करून आहे.
11,000 पेक्षा जास्त ऑर्डर..
दोनही एसयूव्हीला (SUV) सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः, लोक जिमनी आणि फ्रॉन्क्सला खूप पसंत करत आहेत व बुकिंग करत आहेत. जिमनीसाठी तर आतापर्यंत सुमारे 1,000 प्रति दिन या दराने 11,000 हून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या विपणन आणि विक्री, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव, यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स पॉवरट्रेन..
मारुती सुझुकी दोन पेट्रोल इंजिन आणि 5 व्हेरिएंटसह Fronx कॉम्पॅक्ट SUV लाँच करणार आहे. यात बलेनो-आधारित 1.2-लिटर इंजिन मिळते, जे 6,000rpm वर 88bhp आणि 113Nm पीक टॉर्कचे आउटपुट तयार करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडलेली आहे. या कारमध्ये 1.0-लिटर बूस्टरजेट इंजिन देण्यात आले आहे, जे 5,500rpm वर 98bhp आणि 147Nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारचे 5 – स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6 -स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
अशी आहे मारुती सुझुकी जिमनीची पॉवर :-
मारुती सुझुकी जिमनी एसयूव्हीच्या पॉवरबद्दल बोलायचं झालं तर, मारुती जिमनीमध्ये K15B इंजिन देण्यात आलं आहे, यात 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन मिळते, जे 103 bhp ची कमाल पॉवर आणि 134 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक किंवा 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यात मारुतीचे माईल्ड – हायब्रीड टेक्नॉलॉजीही मिळते. फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टीम एसयूव्हीच्या सर्व मध्ये मानक वैशिष्ट्य म्हणून देण्यात आले आहे.
सेफ्टीकडेही दिलंय संपूर्ण लक्ष..
ऑफ-रोड एसयूव्ही असल्याने या मॉडेलमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्टसह ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर-व्ह्यू कॅमेरा आणि EBD सह ABS सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
किती असेल किंमत..
Maruti Suzuki Jimny पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते आणि त्याची संभाव्य किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. यात Zeta आणि Alpha सारखे व्हेरियंट असणार आहे. अलीकडेच, महिंद्राने 10 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत रियर व्हील ड्राइव्ह थार लाँच केले आहे, अशा परिस्थितीत जिमनी थेट थारशी स्पर्धा होणार आहे.