Mahadbt Schemes : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ, ट्रॅक्टर, शेततळे, विहिर, पॉलीहाऊससाठी असा करा अर्ज..

0

केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. ‘डीबीटी मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचाही लाभ घेऊ शकतात.

या योजनांचा आता शेतकऱ्यांना लाभ होणार असून वेळ आणि पैसा वाचत असल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. कृषीविषयक योजना मिळविण्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांना दरवर्षी वेगवेगळे अर्ज करावे लागत असे. यातून अनेकदा शेतकरी एखादी योजना घेण्यास उत्सुक नसायचे मात्र केंद्र व राज्य सरकारने यात आता बदल केले आहेत.

कृषीसंदर्भात कुठलीही एखादी अथवा अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर वेगेवेगळे अर्ज भरण्याची गरज नाही. यासाठी ‘डीबीटी’ मध्ये या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर या सर्व योजनांचा फायदा घेता येतो.

हे पण वाचा : पीक फवारणी यंत्रावर मिळवा 3000 ते 1,25,000 पर्यंत अनुदान, पहा, पात्रता, कागदपत्रे, अनुदान, ऑनलाईन अर्ज प्रोसेस

पाण्याचा अपव्यय होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्रात वाढ व्हावी, मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर व अवजारे मिळावीत अशा वेगवेगळया प्रकारच्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.

हे पण वाचा : ट्रॅक्टरसाठी 1,25,000 तर अन्य कृषी यंत्रांसाठी 50 ते 75% अनुदान, पोर्टलवर अर्ज झाले सुरु, पहा, ऑनलाईन अर्ज प्रोसेस

शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान, यावरून दरवर्षी वेगवेगळया टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ मिळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच.. पण, लाभाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो .

अशा आहेत योजना..

1) राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिग, कोल्ड स्टोरेज, सामूहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट, रेपरव्हॅन)

2) मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक – तुषार सिंचन)

3) बिरसामुंडा कृषी क्रांती योजना (अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, अवजारे)

4) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर, पंप, पाईप वगैरे),

5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (अनु. जाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, अवजारे

हे पण वाचा : 5 टनापर्यंत ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी 1.50 लाखांपर्यंत अनुदान ; पहा पात्रता, स्टेप बाय स्टेप प्रोसेस

6) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान)

7) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (50% अनुदान, नर्सरीसाठी शेडनेट, पॉलिटनेल, प्लास्टिक करेट)

8) राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तीकरण, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदा चाळ)

हे पण वाचा : 8 ते 20HP पॉवर टिलरसाठी मिळवा 65 ते 85 हजारापर्यंत अनुदान ; पहा पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस

9) राज्य कृषी योजना (ट्रॅक्टर, कृषी अवजारे)

10) कृषी यांत्रिकी उपअभियान (ट्रॅक्टर, अवजारे)

11) राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वालाख अनुदान व अवजारे 60 टक्क्यांपर्यंत अनुदान) आदी योजनांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.