Maharashtra Board HSC Result 2022 : 12वीच्या निकालाची तारीख ठरली, पाहा, कधी, कुठे आणि कसा पाहता येणार निकाल ?
शेतीशिवार टीम, 7 जून 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ MSBSHSE निकाल : 2022 लवकरच म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
त्यानुसार आता, उद्या 08 जून रोजी 12 वीचा निकाल लागणार आहे. राज्यातील सर्व विभागांचे 10वीचे बोर्डाचे निकालही येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.
कोविड – 19 मुळे गेल्या 2 वर्षांपासुन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यात आलं होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. परंतु यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्यामुळे निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु आता 12वीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
10वी / 12वीच्या किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा :-
10वीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती.
तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
12वीचा रिझल्ट ऑनलाईन कसा पाहाल ?
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2022 पाहण्यासाठी, 1) www.mahresult.nic.in 2) www.hscresult.mkcl.org 3) http://hsc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील नवीनतम सूचना विभागात, महाराष्ट्र एचएससी निकाल 2022,च्या लिंकवर क्लिक करा.
आता निकाल डाउनलोड करण्यासाठी सांगितलेली माहिती प्रविष्ट करा.
जसे – रोल नंबर आणि जन्मतारीख.
यानंतर, निकाल पाहण्यासाठी show result या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर हा बोर्ड परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
आता निकाल डाउनलोड करा.
त्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि भविष्यातील संदर्भासाठी ही सॉफ्ट कॉपी ठेवा.
अशाप्रकारे महाराष्ट्राचा दहावीचा निकाल तपासण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.