नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; एकट्या फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद, पहा तुमच्या जिल्ह्याला कोण ?

0

शेतीशिवार टीम : 24 सप्टेंबर 2022 :- गेल्या तीन महिन्यांच्या या सत्त्तासंघर्षात भाजप – शिवसेना बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे आज रात्री  जाहीर केली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने विरोधी पक्षाकडून सतत आवाज उठवला जात होता. तसेच स्वातंत्रदिनालाही पालकमंत्री जाहीर नसल्याने अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं होतं.

तसेच नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर परीस्थितीमध्ये ही जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जनमाणसांतून आवाज उठवला जात होता. परंतु आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिह्यानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे.

यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची चलती पाहायला मिळाली आहे. त्यांना आधीच मंत्रिमंडळात महत्वाचे पदांवर स्थान भेटलं आहे. त्यांच्याकडे वित्त व नियोजन, गृह खात्यांसह विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही महत्वाची खाती देण्यात आली आहे. आता त्यांची पुन्हा तब्बल 6 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आली.

पहा जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी :-

1) देवेंद्र फडणवीस :- नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
2) राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर आणि सोलापूर,
3) सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर आणि गोंदिया.

4) चंद्रकांत पाटील- पुणे.
5) विजयकुमार गावित- नंदुरबार.
6) गिरीश महाजन- धुळे,लातूर, आणि नांदेड.

7) गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव.
8) दादा भुसे- नाशिक.
9) संजय राठोड- यवतमाळ आणि वाशिम.

10) सुरेश खाडे- सांगली.
11) संदिपान भुमरे -औरंगाबाद
12) उदय सामंत- रत्नागिरी, रायगड.

13) तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद.
14) रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
15) अब्दुल सत्तार- हिंगोली.

16) दीपक केसरकर -मुंबई शहर आणि कोल्हापूर.
17) अतुल सावे – जालना, बीड.
18) शंभूराज देसाई – सातारा, ठाणे.
19) मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर.

Leave A Reply

Your email address will not be published.