महाराष्ट्रात मान्सूनने उशिराने प्रवेश केला असला तरी कमी कालावधीत पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानंतर अजूनही पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, आता मुंबई, पुण्यासह कोकणात पावसाचा जोर कमी होणार असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा यलो अलर्ट देण्यात आला असून भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून तुफान पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत मुंबई, राजगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकणात पाऊस थांबला आहे. त्यामुळे तापमानात वाढ जाणवू लागली असून मुंबईत आठवड्याची सुरुवात उष्णतेने झाल्याचे मुंबईकरांचे मत आहे.
अनेक ठिकाणी उष्णता वाढणार..
या आठवड्यात मुंबईत फारसा पाऊस न झाल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. हा उष्मा फारसा नसेल, असा अंदाज असला तरी, ठाणे जिल्ह्यातही पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत दक्षिण कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा हंगाम संमिश्र राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उष्णतेची शक्यता आहे.
या 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, तिकडे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
14 जुलैनंतर परिस्थितीत होणार बदल..
याशिवाय मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 जुलैनंतर ही स्थिती सुधारू शकते. तोपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.