शेतीशिवार टीम, 25 जानेवारी 2022 :आपल्या देशात जातीबाबत खूप भेदभाव केला जातो हे तुम्हाला माहीत आहेच. मात्र हा भेदभाव कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना करत असते. यातील एक योजना आंतरजातीय विवाह योजना (Interracial marriage plan) आहे.

या योजनेंतर्गत राज्य सरकार 3 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर रक्कम देते. या महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना 2021 (Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2021) द्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबतचा भेदभाव कमी करणे. ही योजना समाजात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन तर देईलच पण पात्र जोडप्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाते.

आंतरजातीय विवाह योजना 2021 ची वैशिष्ट्ये :-

या योजनेत राज्य शासनाकडून 50 हजार रुपये आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशनतर्फे 2.50 लाख रुपये मिळून एकूण 3 लाख रुपये लाभार्थ्याला रक्कम देण्यात येते.

आंतरजातीय विवाह योजना 2021 द्वारे जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मांमध्ये समानता आणणे होय.

ही रक्कम विशेषत: त्या तरुण किंवा तरुणींना दिली जाते ज्यांनी अनुसूचित जाती किंवा जमातीतील तरुण आणि तरुणींशी लग्न केले आहे.

महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना 2021 अंतर्गत, लाभार्थ्यांना पुरविण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. त्यामुळे लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक असून बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असावं.

या योजनेतील वार्षिक उत्पन्न मर्यादाही रद्द करण्यात आली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेता येईल.

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2021 साठी पात्रता :-

अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

आंतरजातीय विवाह योजनेत मिळणारी रक्कम मिळविण्यासाठी तरुण व मुलीचे वय अनुक्रमे 21 व 18 वर्षांपेक्षा कमी नसावं.

विवाहित जोडप्यांपैकी एक मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जाती किंवा जमातीचे आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2021 चा भाग असणे अनिवार्य आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारी प्रोत्साहन रक्कम मिळविण्यासाठी विवाहित जोडप्याने कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे.

आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य प्रवर्गातील तरुण किंवा मुलीशी विवाह केल्यास, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो…

आंतरजातीय विवाह योजनेची आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड
बँक खाते पासबुक
जात प्रमाणपत्र
वय प्रमाणपत्र
न्यायालयीन विवाह प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2021 साठी अर्ज (Inter-Caste Marriage Scheme 2021) कसा करावा ?

सर्वप्रथम, अर्जदाराने महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर (maharashtra.gov.in जावे. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर,तुमच्यासमोर होम पेज उघडेल.

या होम पेजवर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजनेचा (Inter-Caste Marriage Scheme) ऑप्शन दिसेल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल.

या पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड (Uploading documents) करावी लागतील, त्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे तुमचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *