शेतीशिवार टीम, 27 जानेवारी 2022 : जर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) छोट्या बचत योजनांमध्ये (Small savings plans) गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसला फक्त एकदाच भेट द्यावी लागणार आहे.

एकदा RD, PPF किंवा सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samrudhi Yojana) खाते असल्यास, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन रक्कम जमा करू शकता. यासह, तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये बचत खाते (Savings account) उघडावे लागेल, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन रक्कम जमा करू शकता.

टॅक्स (Tax) वाचवण्यास होईल मदत…

हे महत्वाचं वाचा…

पोस्ट ऑफिस 9 प्रकारच्या बचत योजना ऑफर (Small savings plans) करते. RD, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी खाते (SSY) यासह अनेक पोस्ट ऑफिस बचत ठेव योजना आहेत, यापैकी बहुतेक योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर (Tax) लाभ देतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारने या अल्पबचत योजना लोकांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत.

सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस Post Office योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने 31 डिसेंबर 2021 रोजी परिपत्रकाद्वारे ही घोषणा केली होती.

कसे कराल पैसे ऑनलाईन, ट्रान्सफर घ्या जाणून…

तुम्ही आयपीपीबीद्वारे (IPPB) पोस्ट ऑफिस आरडी, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये पैसे कसे हस्तांतरित करू शकता, प्रोसेस पहा –

>> सर्वप्रथम तुमच्या बँक अकाउंट्स मधून IPPB खात्यात पैसे टाका.
>> नंतर DOP Products वर जा.
>> येथे तुम्ही पीपीएफ (PPF) किंवा सुकन्या समृद्धी (SSY) अकाउंटचा ऑप्शन निवडा.
>> तुम्हाला तुमच्या PPF खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर PPF निवडा.
>> तुमचा पीपीएफ खाते क्रमांक (PPF account number) आणि नंतर डीओपी ग्राहक आयडी प्रविष्ट (DOP Customer ID) करा.
>> सुकन्या समृद्धी खात्यातही योगदान या अँप्सद्वारे पैसे ट्रान्सफर करता येईल.
>> तुमचा SSA खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी प्रविष्ट करा.
>> आता येथे तुम्ही तुमची इंस्टॉलेशन रक्कम निवडा.
>> त्यानंतर IPPB तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे यशस्वी पेमेंट ट्रान्सफरसाठी सूचित करेल.

तुम्हाला किती व्याज मिळेल :-

PPF वर 7.1 टक्के व्याजदर आहे. तर मुलींसाठी सुकन्या समृद्धी ठेव योजनेवर 7.6% व्याज दिलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *