Take a fresh look at your lifestyle.

कृषी योजनांबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय । आता अर्ज करा अन् तात्काळ मिळवा पूर्व संमती…

0

शेतीशिवार टीम, 17 एप्रिल 2022 :- राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासा आणि खुशखबर देणारा महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मुळे शेतकऱ्यांना पावसाळा लागण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

या शासन निर्णयामुळे राज्य शासन / केंद्र शासन / जागतिक बँक यांच्या साहाय्याने राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना या एप्रिलच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राबवून तात्काळ पूर्वसंमती देण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील निर्णय घेऊन स्थायी आदेश घेण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या योजना राबवत असताना या योजनांची अंमलबजावणी करताना बऱ्याच योजना वेगवेगळ्या हंगामात राबवल्या जातात. शेतकऱ्यांना जेव्हा त्याची गरज असते त्यावेळेस त्या योजनांचा लाभ मिळत नाही, जसे की शेततळे शेततळे योजनेसाठी जर एप्रिल-मेमध्ये पूर्व संमती मिळाली तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत अनुदानावर दिली जाणारी अवजारे ही शेतीच्या पूर्वमशागतीसाठी लागतात.

त्यामुळे योग्यवेळी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून सरकारने केलेल्या अर्जाची तात्काळ दाखल घेऊन शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी शासन निर्णय घेतला आहे. आता तुम्ही या योजनांसाठी अर्ज केला असेल तर लवकरच तुमची लॉटरी लागू शकते. ज्यांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यानी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आले.

याबाबत घेण्यात आलेला शासन निर्णय या लिंकवरून तुम्ही पाहू शकता :- maharashtra.gov.in PDF

राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर त्याचबरोबर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाह्य मिळवण्याकरता देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना राबवली जाते. आणि याच अभियानाच्या अंतर्गत एक ते सहा घटक राबवले जातात ज्याच्या मधील एक ते दोन या घटकासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 100% तर उर्वरित सहा घटकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 60% तर राज्य शासनाच्या माध्यमातून 40% इतकं अनुदान दिले जातं.

आणि याच योजनेच्या अंतर्गत अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर्स अनुदानासाठी अर्ज केले होते ते आता करून पात्र झाले होते आणि आता त्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे अनुदानाची. आणि हेच अनुदान वितरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन 55. 80 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला केला असेल त्यांना लॉटरी लागू शकते तर ज्यांना लॉटरी लागली असेल त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

JR पहा… maharashtra.gov.in

आता आपण या कृषी यंत्रीकरण योजना महाराष्ट्र : 2022 ऑनलाइन फॉर्म, शेवटची तारीख, पात्रता, लाभ कागदपत्रांविषयी जाणून घेउयात…

काय आहे ही योजना :-

सध्या राज्य सरकार केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. पण राज्य सरकारही शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात मागे राहिले नाही. विविध राज्यांच्या सरकारांकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जात आहेत आणि अशीच एक योजना म्हणजे ‘कृषी यांत्रिकीकरण योजना : 2022.

महाराष्ट्र शासनामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राहणार्‍या शेतकर्‍यांना मुख्य कृषी उपकरणांच्या खरेदीवर 80% पर्यंत अनुदान मिळत आहे. कृषी औजारांच्या महागाईमुळे अनेक शेतकरी आवश्‍यक अवजारेही खरेदी करू शकत नाहीत, त्यामुळे उत्पादनात घट होऊन त्यांचे नुकसान होते. तुम्ही महाराष्ट्रात राहत असल्यास, तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करू शकता आणि उपकरणे खरेदीवर अनुदान मिळवू शकता. या लेखात आपण ‘कृषी यांत्रिकीकरण योजना काय आहे आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा’ याबद्दल जाणून घेणार आहोत…

कोणती यंत्रसामग्री खरेदी करू शकता… 

1. ट्रॅक्टर (40 HP पर्यंत)  :- ट्रॅक्टर योजनेंतर्गत नवीन ट्रॅक्टर खरेदी करताना 65% अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात दिलं जातं. शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 1 ते 1.50 लाखांचा लाभ मिळेल…

2. पॉवर टिलर (8 HP किंवा अधिक)
3. पंपसेट (7.5 HP)
4. झिरोटील सीड ड्रिल, शुगरकेन कटर प्लांटर, रीपर, बाइंडर
5. पॉवर थ्रेशर
6. विनिंग फॅन, चीफ कटर (मॅन्युअल)
7. ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर
8. एरो ब्लास्ट स्प्रेअर
9. रोटाव्हेटर
10. सीडड्रिल / झिरोटील सीडड्रिल / मल्टी क्राफ्ट प्लांटर / रिज फॅरो प्लांटर
11. नॅपसॅक स्प्रेअर / फूट स्प्रेअर / पॉवर स्प्रेअर
12. लेजर लँड लेव्हलर
13. पंप सेट
14. स्प्रिंकलर सेट

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना : 2022 –  कागदपत्रे :-

7/12 व 8A ,
बँक पास बुक
आधार कार्ड
यंत्राचे कोटेशन,
परिक्षण अहवाल
जातीचा दाखला.
पासपोर्ट फोटो

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना : 2022 – पात्रता :-

योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ फक्त शेतकरीच घेऊ शकतो.
ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेताचा 7/12 आणि 8-अ असावा.
लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यंत्राची लेखी मागणी मिळणे बंधनकारक असेल.

महा डीबीटी (Maha DBT) शेतकरी योजना रजिस्ट्रेशन : 

1) नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत पोर्टल वर जा किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

2) होमपेजवर पोहोचल्यानंतर, नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

3) पुढील पोस्टवर तुमचा नंबर टाका आणि स्वतःसाठी युजर्स नेम आणि पासवर्ड तयार करा, पासवर्ड 8 ते 20 Character चा असावा हे लक्षात ठेवा, पासवर्डमध्ये संख्या, शब्द आणि विशेष Character वापरा.

4) आता तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी पडताळणी (OTP verification) किंवा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतर दिलेल्या नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा, अशा प्रकारे तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता….

5) आता झालं तुमचं महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्टेशन.. ( टीप : राज्यातल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्ट्रेशन करणं अति आवश्यक आहे)  

आता आपण महा डीबीटी (Maha DBT) पोर्टलवर पीक फवारणी यंत्राबाबत अर्ज कसा कराल ? ते पाहूया… (टीप : तुम्हाला ज्या यंत्रासाठी अजर करायचा आहे त्यांनी यंत्रात बदल करावा)  

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून आपला अर्ज या योजनेसाठी पात्र ठरवला जाईल.

3) यानंतर ‘अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सर्व योजनांची माहिती आपल्याला दिसेल. या मध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची अवजारे यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी आपल्याला ‘Choose items’ वरती क्लिक करायचे आहे.

4) यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक अर्ज open होईल. आपल्याला सर्वात मुख्य घटक प्रथम निवडायचे आहे. मुख्य घटकामध्ये कृषी यंत्रे अवजारे खरेदीसाठी अर्थसाह्य यावर क्लिक करावे.

5) यानंतर पुढची बाब आहे तपशील details. या तपशीलमध्ये आपल्याला ‘ट्रॅक्टर पावर टिलर चलीत अवजारे’ यावर क्लिक करायचे आहे.

6) यानंतर एचपी श्रेणी निवडा आणि यंत्रसामुग्री अवजारे ही उपकरणे निवडा. यातून पीक संरक्षण अवजारे संरक्षण अवजारे हा ऑप्शन निवडावा.

7) यानंतर मशीनचे प्रकार निवडा.

8)  मी पूर्व संमती शिवाय कृषी अवजारांची खरेदी करणार नाही, आणि केल्यास मला अनुदानास पात्र राहता येणार नाही या गोष्टीची जाणीव आहे.

9) माझ्या कुटुंबातील सदस्याच्या आणि माझ्या मालकीचा हा ‘पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर’ आहे. या दोन्ही बाबींवर क्लिक करायचे आहे.

10) यानंतर ‘जतन करा’ यावर क्लिक करायचे आहे.

11) यानंतर सर्व घटक तपशील यशस्वीरीत्या जोडले आहे. आपल्याला आणखी घटक जोडायचे आहेत का? असे दिसेल, जर तुम्हाला आणखी काही घटक जोडायचे असतील तर Yes करून जोडू शकता. नाहीतर No करून पुढे जावे.

12) यानंतर पुन्हा मुख्यपृष्ठावर आल्यानंतर आपल्याला ‘अर्ज करा’ यावर क्लिक करावयचे आहे. यानंतर आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्या आहेत का याची खात्री करून घ्या.

13) यानंतर ‘पहा’ वर क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या सर्व बाबी दिसतील. यावर आपल्या गरजेनुसार सर्व बाबींना प्राधान्यक्रम द्यावा.

14) ‘या योजनेंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्याच्या अटी- शर्ती. आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील’ यावर टिक करा.

15) यानंतर ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वीच या सर्व बाबींसाठी पेमेंट केलेलं होतं त्यामुळे आपल्याला पेमेंट करण्याचे ऑप्शन येणार नाही, परंतु 2021- 22 साठी अर्ज केलेला नसेल आणि नव्याने अर्ज करत असाल तर मात्र आपल्याला डायरेक्टली अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर पेमेंट ऑप्शन दिला जाईल.

16) आपला हा अर्ज पात्र झाल्यास त्यावर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यानंतर संमतीपत्र दिलं जाईल. या आधारे तुम्ही दिलेल्या कोटेशननुसार अवजार खरेदी करून बिल येथे जोडू शकता. आणि नंतर आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जाईल.

अशाप्रकारे सर्व प्रक्रिया करून तुम्ही पीक फवारणी यंत्रासाठी अनुदान मिळवू शकता…

आपल्या शेतकरी बांधवांसाठी :- 

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली शेतीशिवार ची बातमी आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करायचा असेल ते खालील लिंक वर क्लिक करा.  

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना : 2022

Leave A Reply

Your email address will not be published.