शेतीशिवार टीम, 12 एप्रिल 2022 :- कोरोना आजारामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकाला 50 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान दिलं जातं. काल या योजनेसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आला असून नियमासंदर्भातील एक शासन परिपत्रक 11 एप्रिल 2012 रोजी घेण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकाबद्दलची महत्वपूर्ण माहिती आपण शेतीशिवारच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…
तुम्हाला माहितीच असणं, गौरव कुमार बंसल विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये 4 ऑक्टोबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकाला 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशा प्रकारचा निकाल देण्यात आला होता.
या निकालाच्या अनुषंगानं महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार 26 नोव्हेंबर 2021 पासून ही योजना राज्यामध्ये राबविण्यात अधिकारीक मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले गेले आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली होती.
परंतु, सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशाला अनुसरून या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून या अर्जासाठी नवीन मुदत दिली आहे.
(1) कोव्हिड -19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु .50,000 / – इतके सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुढील प्रमाणे राहिल…
(i) कोव्हिड -19 या आजारामुळे दि. 20 मार्च, 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास दि. 24 मार्च, 2022 पासून 60 दिवसाच्या आत म्हणजेच दि. 24 मे, 2022 पर्यंत
(ii) कोव्हिड -19 या आजारामुळे दि. 20 मार्च, 2022 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून ९90 दिवसांच्या आत.
(2) या योजनेखाली अर्ज करण्यासाठी वर नमूद केलेल्या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारण समिती (GRC) मार्फत करता येणार आहे.
(3) वरील अनुक्रमांक ( 1) येथील अर्ज करण्याची मुदतीत राज्यातील सर्व व्यक्तींना माहिती व्हावी याकरिता यापुढे प्रत्येक 15 दिवसाला एकदा याप्रमाणे 6 आठवड्याकरिता सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रिंट व ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जाहिर प्रसिध्दी द्यावी.
(4) या योजनेकरिता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे, त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करावी.
(5) वरील आदेश विचारात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे :-
आधार कार्ड
बालक आणि मृत व्यक्तीचा रहिवासी दाखला
आई / वडील कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झाल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत…
बँक खात्याचा तपशील
अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची प्रत
पासपोर्ट फोटो
मोबाईल नंबर
मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
अर्ज कसा कराल ?
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाइन वेब पोर्टल बनवलं असून तुम्हाला mahacovid19relief.in या व्हेबसाईटवर जावं लागेल.
यानंतर तुम्हाला ‘नावनोंदणी करा’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर 6 अंकी OTP टाकून सबमिट करा.
यानंतर तुमच्या समोर फॉर्म खुलेल त्यामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक अर्ज भरून सबमिट करा.
टीप : जर स्वतः अर्ज करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकतो…
नम्र विनंती :- कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या निराधार झालेल्या बालकांना हा निधीतुन त्यांच्या शालेय शिक्षणाला हातभार लागेल, त्यामुळे गावातील सरपंच / उपसरपंच / ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या भागातील मुलांना हा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करावे…