Maharashtra Rain : नगर, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा विजांसह गारपिटीचा इशारा ! पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट..
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उष्णतेची लाट पाहवयास मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे.
पुढील 7 दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किनारपट्टीवरील शहरे वगळता राज्यातील बहुतांश भागात वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे..
अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 20 आणि 21 आणि 22 तारखेला कोकण गोव्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज हवामान कोरडे राहिले. दरम्यान, उद्यापासून पुढील पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे, तर धाराशिव, लातूर,परभणी नांदेडमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
कसे असणार मुंबईचे हवामान
पुढील पाच ते सात दिवस पुण्याभोवती अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात तापमानात घट दिसून आली. त्यामुळे वाढत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला.
किनारपट्टीवरील सरासरी कमाल तापमान 34 अंश होते. मध्य महाराष्ट्रात सरासरी 39 अंश सेल्सिअस, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे..
या जिल्ह्यांमध्ये 40 च्या पुढे गेला पारा
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. येथील सरासरी तापमान 41 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली. तापमानाचा पारा 43.2 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने जळगाव राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे. आजचे छत्रपती संभाजीनगरचे तापमान 42.2.अंश सेल्सिअस तर परभणीचे 42.5 अंश सेल्सिअस इतके होते..