आगामी काळात उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार असल्याचे लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने नांदेड – पनवेल – नांदेड विशेष रेल्वेच्या 40 फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नांदेड – पनवेल व पनवेल – नांदेड द्वि – साप्ताहिक विशेष गाडीच्या प्रत्येकी 20 फेऱ्या होणार आहेत. यात हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी 22 एप्रिल ते २६ जून दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 11 वाजता सुटणार आहे.

परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर , रोटेगाव , नगरसोल अंकाई इगतपुरी , कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेऱ्या पूर्ण करेल.

पनवेल ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी 23 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 4.30 वाजता पोहोचेल.

ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेऱ्या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 22 डब्बे असतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *