Maharashtra Rain Alert : हवामानात अचानक बदल! आज रात्री पुणे-नगरसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, जाणून घ्या IMD चे नवे अपडेट..
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या चेतावणीनुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे. आज बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज रात्रीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पावसाचा पिकांना होणार मोठा फायदा..
बुधवारी पहाटे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात हलका ते हलका पाऊस झाला. हा पाऊस ज्वारीसह रब्बी हंगामातील सर्व पिकांसाठी फायदेशीर मानला जात आहे. अशा स्थितीत द्राक्षे पिकवणाऱ्या शेतकऱ्यासाठी काही प्रमाणात हानीकारक ठरणार आहे. सोलापूरमध्ये 28 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, मध्यरात्रीच्या सुमारास पाऊस सुरू झाला आणि सकाळपर्यंत कमी – अधिक प्रमाणात सुरूच होता. काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तर काही भागात हलका व मध्यम पाऊस झाला. दक्षिण, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा आदी तालुक्यांमध्येही हा पाऊस झाला आहे.
अनेक भागांत मुसळधार पाऊस..
बुधवारी सकाळपासूनच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून सकाळी काही भागात पाऊस झाला. येत्या दोन – चार दिवसांत असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा पावसाअभावी जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत. ज्यांनी पेरणी केली त्यांची उगवण पूर्ण झालेली नाही. हा पाऊस ज्वारीसह इतर रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरणारा आहे.
पिकांसाठी फायदेशीर ठरणार..!
पुन्हा दमदार पाऊस झाल्यास रब्बीच्या पेरणीला विलंब होण्याची शक्यता आहे. हे खरिपातील तूर पिकासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. कापणी केलेल्या द्राक्षबागा यावेळी फुललेल्या आहेत. त्यामुळे पावसामुळे गळती होऊ शकते. औषध फवारणी वाढल्याने खर्च वाढतो असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..
कोल्हापूर, सांगली, रायगडमध्ये पाऊस..
कोल्हापुरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. राधानगरी, भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. आदमापूर परिसरातही जोरदार पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसाने भात पिकाचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील काही भागातही पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातही पाऊस झाला होता..
कोकणात विजांच्या कडकडाटासह पाऊस..
सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस सुरु आहे.
अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात अडकला आहे. भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची चिंता आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.