केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारे दिवस खूपच आनंदाने भरलेले असणार आहे. केंद्र सरकारकडून त्यांना खूपच चांगलया बातम्या मिळणार असून त्या वेतन आयोगाशी संबंधित असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग आणण्याच्या तयारीत आहे.

याबाबत सरकारकडून कोणतेही औपचारिक वक्तव्य आलेलं नाही. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते, अशी अपेक्षा आहे..

8th Pay Commission ची तयारी सुरू..

8 व्या वेतन आयोगाबाबत दिल्लीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आंदोलन सुरू आहे. महिनाभरात सलग दुसऱ्यांदा सरकारने पुढील वेतन आयोगाबाबत परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. सरकारने यावर निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते.

आतापर्यंत 8 वा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती. परंतु, पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू असल्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. याकडे सरकार लक्ष देत असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे..

पगारात होणार मोठी वाढ..

2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत मोठी चर्चा होऊ शकते. मात्र, पुढील वर्षी वेतन आयोग कधी स्थापन होणार ? हे सांगणे जरा घाईचे ठरू शकतं. 8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, वेतन आयोगासाठी कोणतेही पॅनल तयार करण्याची गरज नसावी याच्या बाजूने सरकार आहे. त्यापेक्षा वेतन आयोगातच वेतन सुधारणेचे नवे सूत्र असावे. यावर सध्या विचार सुरू आहे.

आठवा वेतन आयोग कधी येणार ?

जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर, 2024 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जावा. त्याचबरोबर दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, असे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात अनेक बदल शक्य आहेत. फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात. आत्तापर्यंत सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते..

पगारात किती होणार वाढ..

7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढेल. तसेच, फॉर्म्युला काहीही असो, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 44.44% वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचार्‍यांसाठी येणार वर्ष खूपच आनंददायी ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *