Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Rain : पुणे-अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीसह मुसळधार पाऊस, हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचा अंदाज..

0

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होवून पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. गेले काही दिवस ढगाळ हवामानही आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात बदल होत आहे. सध्या थंडीचा कडाका कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील काही दिवसात थंडीचा कडाकाही वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तापमानात गत काही दिवसांपासून चढ – उतार सुरू असून आता विशेषतः खान्देश व लगतच्या नाशिक, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मंगळवारी 6 ते 9 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे.

मंगळवारी पश्चिम मध्यप्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील काही तालुक्याच्या तुरळक भागात गारपीटीची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर म्हणजेच गुरुवारी (दि 11) जानेवारीपासून उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे वाहणार असल्याने महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर 6 ते 10 जानेवारी दरम्यान पहाटेचे किमान तापमान हे 16 डिग्री सेल्सिअस व दुपारचे कमाल तापमान 28 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणार आहे.

पुणे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता..

पुणे शहर परिसरात मेघगर्जना विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील काही दिवसात थंडीचा कडाकाही वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होवून पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे . गेले काही दिवस ढगाळ हवामानही आहे . त्यामुळे कमाल व किमान तापमानात बदल होत आहे. सध्या थंडीचा कडाका कमी झाला आहे.

शनिवारी ( दि.6) किमान तापमान 14.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. उपनगरातही किमान तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. शनिवारी पाषाण येथे 12.3 अंश सेल्सिअस इतके तापमान होते तर एनडीए 12.8, कोरेगाव पार्क 17.8, मगरपट्टा 19 तर वडगावशेरी येथे 20 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी (दि. 6) पाऊस पडला. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान कमी झाले असून ते 29.5 अंश आणि जिल्ह्याच्या काही भागात सेल्सिअसवर आले आहे.

दरम्यान येत्या 7 जानेवारी दरम्यान, आकाश अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. सकाळी धुके पडणार असून पाऊस पडणार आहे. शहरात अतिहलक्या स्वरुपाचा तसेच 8 व 9 जानेवारीला मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पुणे शहर परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असून सकाळी धुके असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.