राज्यातील महिला उद्योजकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम’ राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरु केला आहे.

ज्यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या नवीन व्यवसायाचे सक्षम व शास्वत उद्योगात रूपांतर करता येईल. हा कार्यक्रम सुरुवातीच्या टप्प्यातील उपक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी तयार केलाला आहे, ज्यामध्ये त्यांना उद्योजकीय कौशल्ये, त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाईल आणि कार्यक्रम संपल्यानंतरच्या मदतीसाठी स्थानिक महिलांचे नेटवर्क तयार केलं जाणार आहे. या उपक्रमाद्वारे महिला उद्योजकांना आवश्यक ते पाठबळ पुरवून राज्याच्या शास्वत विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा “महिला उद्योजकता कक्ष, अमेरिकी दूतावास व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च” (ACIR) यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” राबविण्याचे नियोजित केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच त्या संबंधीचे नियोजन आणि उपक्रम हाती घेण्याच्या उद्दिष्टाने महिला उद्योजकता कक्षाची स्थापना करण्यात आली. हा कक्ष सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने कार्य करतो आणि महिला उद्योजक आणि भागीदार संस्थांमध्ये सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यास मदत करतो तसेच महिला उद्योजकतेसाठी पूरक धोरण तयार करण्याचे काम करतो.

हा कक्ष राज्यातील महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतो आणि महिलांना उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतो. महिला उद्योजकता कक्षाने महिला उद्योजकांना समर्थन देण्यासाठी विविध उपक्रमांची योजना आखली आहे ज्यामध्ये मार्गदर्शन आणि इनक्युबेशन समर्थन, आर्थिक सहाय्य आणि अनुपालन समर्थन यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री नवाब मलिक काय म्हणाले…

राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामाध्यमातून महिला उद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून कार्यक्रम आणि प्रशिक्षण हे 8 मार्च 2022 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू होणार आहे.

या प्रशिक्षणामधून उद्योगाचा विकास कसा करावा यासह स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत आपली कल्पना कशी “पिच” करावी अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रमाची उद्दिष्टे :-

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जाणार आहे.

4 जानेवारी 2021 रोजी या सोसायटीअंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची (Women Entrepreneurship Cell) स्थापना करण्यात आली आहे. स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, महिला उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे, आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे ही या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

उपक्रमाचे ठळक उद्दिष्टे व फायदे :-

हा उपक्रम महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी द्वारे प्रायोजित केला आहे.
सर्वोत्तम 6 प्रतिभागींना Nexus इनक्युबेशन कार्यक्रमामध्ये इनक्यूबेट होण्याची मोठी संधी
मजबूत स्थानिक नेटवर्क बनवणे
अग्रगण्य महिला उद्योजकांकडून मार्गदर्शन मिळेल.
सर्वांच्या सहयोगातून आवश्यक मार्गदर्शन लाभेल.
समवयस्क उद्योजकांकडून मार्गदर्शन लाभेल.
महिलांना स्टार्टअप वाढवण्यासाठी 10 ते 20 लाखांपर्यंत अनुदान…

पात्रता / निकष :-

फक्त महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र.
अर्जदार ही नाविन्यपूर्ण उपक्रम /स्टार्टअपची संस्थापक किंवा सह-संस्थापक असावी.
अर्जदारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
सहभागींना इंग्रजीचे कार्य ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण सर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग इंग्रजीमध्ये असतील.
अर्जदार भारतीय नागरिक आणि महाराष्ट्र निवासी असणे आवश्यक आहे.

निवडीसाठीचे काय आहेत निकष :-

हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महिला उद्योजकांसाठी आहे.
एकदिवसीय कार्यशाळेसाठी स्टार्टअप अर्जदारांची निवड खालील निकषांचा वापर करून केली जाईल:
प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट (POC) च्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्स / व्यवसायांना प्राधान्य दिले जाईल.
संबंधित प्रदेशातील समस्येची प्रासंगिकता
स्टार्टअप / व्यवसायामध्ये एक महिला संस्थापक / सह-संस्थापक असणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाची रचना :-

ACIR च्या ऑनलाइन स्टार्टअप लॉंच कार्यक्रमासाठी 120 महिला उद्योजकांची निवड केली जाईल. हा कार्यक्रम सुरुवातीच्या टप्यातील उयोजकांकरीत तयार केलेला आहे.
या ऑनलाइन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून स्टार्टअप लॉंच करणे व यशस्वीरीत्या चालवणे याविषयीचे मार्गदर्शन केले जाईल.
60 उद्योजकांना 1 दिवशीय ऑनलाइन कार्यशाळेसाठी निवडले जाईल ज्यामध्ये त्यांना शास्वत व्यवसाय निर्माण करण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाईल.
निवडक 30 उद्योजकांना 2 दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत निमंत्रित केले जाईल जेथे त्यांना उद्योजकतेविषयीचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल. यापुढे,
सर्वोत्कृष्ट 6 उद्योजकांना Nexus प्री-इनक्यूबेशन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
प्रगत प्रशिक्षणार्थींसाठी 4 ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

कागदपत्रे :-

आधार कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
स्टार्टअप अहवाल (Startup report)
मूळ पत्ता पुरावा
बँक खाते क्रमांक आणि पासबुक
वयाचा पुरावा

अर्ज कधी कराल ?

“महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” या उपक्रमात भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधील महिला उमेदवार अर्ज करू शकता..

या उपक्रमात भाग घेण्यासाठी 17 फेब्रुवारी 2022 अर्ज भरण्यास सुरुवात..
अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 25 फेब्रुवारी 2022 ही आहे.

अर्ज कसा कराल ?

इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या वेबसाईटला लवकरात लवकर भेट द्यावी.

 

 

तुम्हाला हे प्रश्न पडलेत का ?  

प्रश्न : अर्ज कसा करावा ?
उत्तर : अर्ज करण्यासाठी कृपया हा ऑनलाइन फॉर्म भरावा​

प्रश्न : माझी निवड झाली आहे की नाही हे मला कसे कळेल?
उत्तर : आपण निवडल्यास आपल्याला १ मार्च २०२२ पर्यंत आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेलद्वारे माहिती दिली जाईल.

प्रश्न : या कार्यक्रमासाठी काही शुल्क आहे का?
उत्तर : नाही. हा कार्यक्रम पूर्णतः अनुदानित आहे.

प्रश्न : अधिक माहितीसाठी मी कोठे पोहोचू शकतो?
उत्तर : अधिक माहितीसाठी कृपया malika@startupnexus.in आणि ruchi@msins.in येथे संपर्क साधा

प्रश्न : ऑनलाईन कार्यशाळांसाठी कोणते व्यासपीठ वापरले जाईल ?
उत्तर : सर्व कार्यशाळा झूमवर आयोजित केल्या जातील, कार्यशाळेत सामील होण्यासाठी आपल्याला एक दुवा मिळेल. झूमवरील मीटिंग्जमध्ये कसे सामील व्हायचे ते जाणून घ्या हे छोटे व्हिडिओ पाहा – मराठी ट्यूटोरियल | इंग्लिश ट्यूटोरियल

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा malika@startupnexus.in

प्रश्न : कार्यशाळेसाठी निवड निकष काय आहेत?
उत्तर : दोन दिवसांच्या कार्यशाळेसाठी खालील निकषांचा वापर केला जाईल:

स्टार्टअप्स / महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांमध्ये नाविन्यपूर्ण प्रक्रिया किंवा उत्पादने असणे आवश्यक आहे.

बौद्धिक संपदा हक्क असणे किंवा त्यांच्या संरक्षणाची योजना असणे आवश्यक.

इंग्रजी भाषेत लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *