Take a fresh look at your lifestyle.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी : 2022 । सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ…

0

शेतीशिवार टीम : 22 मार्च 2022 : राज्यातील अर्थसंकल्प (2022) सुरु असून या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50 हजार रुपये अनुदान, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी, डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंर्तगत 911 कोटी रुपये निधीची घोषणा, शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करुन ते 75 हजार रूपये वाढवले.

परंतु या सर्व घोषणा होताना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून रखडलेला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा ? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. घोषणा झाल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला होता.

या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली आहे. या उर्वरीत 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी मार्च अखेरपर्यंत होणार असून त्याच्या खात्यात 200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी विधान परिषदेमध्ये दिली. त्यामुळे राज्यातील 54 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

2 लाखापर्यंतचे कर्ज होणार माफ…

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर 21 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती.

परंतु त्यानंतर कोरोनाचे संकट अन् राज्याच्या तिजोरीतील खडखडाट यामुळे प्रोत्साहनपर रक्कम आणि उर्वरीत 54 हजार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी रखडली होती. परंतु येत्या 8 चं दिवसांत म्हणजे मार्च अखेरपर्यंत त्या 54 हजार शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी पुढे सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले असून खरीप हंगाम अद्याप सुरू असून ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचेही बाबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावं…

पिकासाठी घेतलेले कर्ज ही राज्य शासनाकडून माफ करण्यात येणार असून 30 सप्टेंबर 2019 पर्यंत राज्य शासनाकडून माफ करण्यात येणार आहे. आज, या लेखाद्वारे, आम्ही तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व माहिती जसे की अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता इ. जाणून घेउयात…

महाराष्ट्र कर्जमाफीची प्रक्रिया कशी पडते….

या योजनेंतर्गत राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधार कार्डशी संलग्न करून विविध कार्यकारी सहकारी संस्थांशी संलग्न करण्यात यावे.

मार्च 2020 पासून बँकांनी आधार कार्ड क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या नोटिस बोर्डवर तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
या याद्या राज्यातील शेतकऱ्याच्या क्रेडिट खात्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देईल.
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधारकार्डसोबत युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सोबत ठेवावा लागेल आणि त्यांचा आधार क्रमांक आणि कर्जाची रक्कम पडताळण्यासाठी ‘आपले सरकार सेवा’ केंद्राला भेट द्यावी लागेल.
पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मंजूर झाल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम आणि आधार क्रमांक याबाबत वेगवेगळी मते असल्यास ती जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडण्यात येणार आहेत. समिती निर्णय घेईल आणि अंतिम कार्यवाही करेल.

या लोकांना मिळणार नाही ‘या’ योजनेचा लाभ…

माजी मंत्री, माजी आमदार व खासदार

या योजनेअंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी (मासिक पगार रु. 25,000 पेक्षा जास्त) (चतुर्थ श्रेणी वगळता) यांना लाभ दिला जाणार नाही.

राज्यातील सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार संस्था, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरण्यांचे संचालक मंडळ आणि ज्यांचे मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

राज्यातून मासिक 25 हजार रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या व्यक्तीही या योजनेत पात्र असणार नाहीत.

महाराष्ट्रातील अशा व्यक्ती जे कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरतात त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे काय आहेत लाभ :-

या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज महाराष्ट्र सरकारकडून माफ केले जाणार आहे.
1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत अल्प मुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज माफ केले जाईल.
राज्य सरकारच्या कर्जमुक्तीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाईल.
शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यरत सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाईल.
या योजनेचा लाभ राज्यातील अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2022 ची कागदपत्रे (पात्रता) :-

या योजनेंतर्गत अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सरकारी नोकरी करणारे कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
राज्यातील ऊस, फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.
अर्जदाराचे आधार कार्ड
निवास प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2022 मध्ये अर्ज कसा कराल ?

राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करायचे आहेत, ते ऑफलाइन अर्ज करू शकतात, सर्वप्रथम, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे, आधार कार्ड आणि बँक पासबुकसह तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. त्यावर जाऊन तुम्हाला सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आता प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल…

Leave A Reply

Your email address will not be published.