Take a fresh look at your lifestyle.

लॉंच होताच ‘या’ Cars चा बोलबाला ; महिनाभरात मिळालं 50,000 बुकिंग !

0

शेतीशिवार टीम : 22 मार्च 2022 : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने मंगळवारी जाहीर केलं आहे की, नवीन 2022 बलेनो फेसलिफ्ट (2022 Baleno facelift) ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यापासून अवघ्या एका महिन्यात 50,000 बुकिंग मिळवलं आहे.

2022 मारुती सुझुकी बलेनो अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्ससह इंटेरिअर आणि एक्सटेरिअर सह मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. या नवीन Baleno ची 6.35 लाख रुपये (Ex-showroom) ची स्टार्टींग प्राईस 6.35 लाख रुपये असून त्याचं टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये (Ex-showroom) पर्यंत आहे.

जर आपण त्याच्या फीचर्सबद्दल बोललो, तर कंपनीने अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये, तुम्हाला न्यू थ्री-लेयर्ड डिझाइनने सजवलेला डॅशबोर्ड पहायला मिळेल, ज्यामध्ये टॉप मध्ये ब्लॅक, मध्यभागी सिल्व्हर एक्सेंट आणि लोवर साईटला ब्ल्यू कलर आहे.

नवीन बलेनोचे डॅशबोर्ड डिझाइन जागतिक बाजारात विकल्या गेलेल्या नवीन एस-क्रॉससारखे आहे. यात 9.0 – इंचाचा स्मार्टप्ले प्रो, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अलेक्सा कनेक्ट, ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम यासारखी अनेक फीचर्स आहेत.

इंजिन :-

नवीन 2022 Baleno मध्ये, कंपनीने 1.2-लिटर क्षमतेचे K12N पेट्रोल इंजिन वापरलं आहे, जे VVT आणि इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे इंजिन कारचे मायलेज वाढवण्यास मदत करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की या कारचे मॅन्युअल वेरिएंट 22.35km/l आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 22.94km/l मायलेज देते.

सेफ्टी फीचर्स :-

नवीन बलेनो सुझुकी हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात 6 एअरबॅग्ज (ड्रायव्हर, को-ड्रायव्हर, साइड आणि कार्टेन) देखील मिळतात. याशिवाय, ते ESP आणि हिल होल्ड असिस्टने सुसज्ज आहे. Nexa Safety Shield द्वारे संरक्षित, न्यू एज बलेनोच्या सर्व प्रकारांना ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर, मागील पार्किंग सेन्सर्स आणि हाय-स्पीड अलर्ट सिस्टम मिळत आहे.

स्पर्धा :-

मारुती सुझुकी 2022 बलेनोची थेट स्पर्धा Hyundai i20, Honda Jazz, Tata Altroz ​​शी होणार आहे. कंपनी नेक्सा रिटेलच्या मदतीने बलेनोची विक्री करणार आहे, जी विशेषत: प्रीमियम सेगमेंटच्या कार विकण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यावर मारुती सुझुकी सियाझ, इग्निस, XL6 सारख्या गाड्या विकल्या जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.