Take a fresh look at your lifestyle.

मार्च एंडिंगलाच महागाईचा सर्वसामान्यांना डबल झटका | फक्त पेट्रोल – डिझेल, LPG नाही तर, ‘या’ वस्तूंचे रेट ही वाढले…

0

शेतीशिवार टीम : 22 मार्च 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या (LPG) दरात प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यातील महागाईचा हा नवा झटका नाही तर यापूर्वी दूध, सीएनजी आणि मॅगीच्या दरातही वाढ झाली आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सीएनजीच्या (CNG) दरात वाढ करण्यात आली. मुंबईत सीएनजीच्या (CNG) दरात 50 पैशांनी वाढ झाली आहे.

नागपुरात सीएनजीचे (CNG) दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत. नागपुरात प्रतिकिलो (CNG) सीनएनजीसाठी 120 रुपये किलो मोजावे लागतात. रविवारपर्यंत सीएनजीचे दर 100 रुपयांवर होते. पण, एकाच दिवसात 20% वाढ झाली असून सीएनजीची (CNG) किंमत 120 रुपयांवर पोहोचली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला नेस्लेने मॅगीच्या किमतीत रुपयांनी वाढ केली होती. मॅगी नूडल्सचे छोटे पॅकेट आता 12 रुपयांऐवजी 14 रुपयांना विकले जात आहे. मोठ्या पॅकसाठी ग्राहकांना 3 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. तसेच नेसकॅफे क्लासिक, ब्रू – बॉन आणि ताजमहाल चहाचे दरही महागले आहे.

तसेच अमूल, मदर डेअरी आणि पराग यांनी दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. तसेच मध्य प्रदेशातील सांची दूध सहकारी संस्थाने प्रतिलिटर 5 रुपयांनी वाढ केली आहे.

मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर आता 110 रुपयांवरून 110.82 रुपये प्रतिलिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 94.20 रुपये प्रति लिटरवरून 95 रुपयांवर पोहचलं आहे.

आजपासून घरगुती LPG सिलिंडरचे दर तब्बल 50 रुपयांनी महागले आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एलपीजी (LPG) सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा मिळत होता. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते.

आजपासून म्हणजेच 22 मार्च 2022 पासून दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.5 रुपयांवर गेली आहे. पूर्वी ते 899.50 रुपये होती. जर आपण कोलकात्याबद्दल बोललो, तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 926 रुपये होती, ती आजपासून 976 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे लखनऊमध्ये किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपये झाली आहे. पाटण्यात ते 998 रुपयांवरून 1039.5 रुपयांवर पोहोचले आहे.

आपल्या मुंबईबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 899.5 रुपये होती, ती आता 949.5 रुपयांवर पोहचली आहे.

येत्या काही महिन्यांत एसी, कुलर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचं कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे.वाढत्या खर्चामुळे दोन वर्षांत कंपन्यांनी आधीच तीन वेळा किमती वाढवल्या आहेत. आता पुन्हा एकदा महागाईचा झटका देण्याची तयारी कंपनीने सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.