Take a fresh look at your lifestyle.

एका चार्जमध्ये 130KM ची रेंज अन् 60kmph चा वेग, 2 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च !

0

शेतीशिवार टीम : 23 मार्च 2022 : इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता iVOOMi Energy ने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल, S1 आणि Jeet लाँच केले आहेत. स्मार्ट टेक्नोलॉजी आणि फीचर्स लोडेड iVOOMi स्कूटर्सना 130KM पर्यंतच्या रेंजसह 60Kmph पर्यंत टॉप स्पीड मिळणार आहे. यात आरामदायी राइडिंग आणि क्विक चार्जिंग सारखे फीचर्स देखील मिळणार आहे.

iVOOMi S1 किंमत आणि फीचर्स :-

iVOOMi S1 ही एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची किंमत ₹ 84,999 आहे. स्कूटर 2KW इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते, जी 65 किमी प्रतितास वेगाने आणि 75 किलो वजनाच्या कर्बसह येते. यात डिस्क ब्रेकची सुविधा आहे. यामध्ये 60V, 2.0Kwh स्वॅपेबल Li-ion बॅटरीद्वारे समर्थित आहे, ज्याला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3-4 तास लागतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही फुल चार्ज करून 115 कि.मी पर्यंत जाऊ शकते.

iVOOMi Jeet ची किंमत आणि फीचर्स :-

iVOOMi Energy ने Jeet मध्ये 2 व्हेरियंट लॉन्च केले आहे. Jeet आणि Jeet Pro मध्ये लॉन्च केलं आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 82,999 रुपये आणि 92,999 रुपये आहे. प्रीमियम डिझाईनवर येत असताना, Jeet आणि Jeet Pro देखील स्वॅपेबल बॅटरीला सपोर्ट करते. Jeet आणि Jeet Pro मध्ये अनुक्रमे 1.5kw-2kW बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर एका चार्जवर 130 किमी पर्यंतची रेंज देतात. ती रेड, ब्ल्यू आणि ग्रे अशा तीन कलर कॉम्बिनेशनमध्ये आणले गेले आहेत.

या दोन्ही स्कूटरचे ग्राउंड क्लीयरन्स 170mm आहे, जे खास भारतीय रस्त्यांसाठी डिझाइन केलेलं आहे. रायडर्सचा कंफर्ट लक्षात घेऊन, iVOOMi स्कूटरमध्ये Find My Scooter, Large 30L Boot Space, पार्किंग असिस्ट आणि USB चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

सध्या भारतात ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर्सचा बोलबाला ; महिनाभरात 7,356 युनिट्सची विक्री…

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. आता पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक आणि स्कूटरसोबतच इलेक्ट्रिक स्कूटरची विक्रीही झपाट्याने वाढत आहे. आपण अशा दोन कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी विकतात. या दोन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्यात हजारो इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

या कंपन्यांनी सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या :-

हिरो इलेक्ट्रिक फेब्रुवारी 2022 मध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरची सर्वात मोठी विक्री झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या रिपोर्ट नुसार, हिरोने 7,356 युनिट्स विकल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात हिरोने केवळ 2,194 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली होती.

 

कंपनीकडे सिटी स्पीड आणि कम्फर्ट स्पीड रेंजमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत. हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे ₹ 47000 पासून सुरू होते. पूर्ण चार्ज केल्यावर ती सुमारे 85 कि.मी अंतर कापते आणि चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात.

त्याचप्रमाणे Okinawa दुसऱ्या स्थानावर आहे. Okinawa ने फेब्रुवारी 2022 मध्ये 5,923 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या आहेत. कंपनी लवकरच भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Oki90 लाँच करणार आहे. ही हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर असेल जी एका चार्जमध्ये 150 कि. मी अंतर कव्हर करू शकते.Oki90 चे टॉप स्पीड 90 कि.मी प्रतितास असू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.