शेतीशिवार टीम : 23 मार्च 2022 : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे,वाहनचालक सुद्धा पर्यायी इंधन ऑप्शन मध्ये प्रचंड रस दाखवत आहेत. अशाप्रकारे, CNG कारच्या वाढत्या मागणीसह, वाहन निर्माते येत्या काही महिन्यांत त्यांच्या मॉडेल लाइनअपवर CNG ऑप्शन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
तसेच या रेंजमध्ये मारुती सुझुकीच्या बलेनो,सियाझ, ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा मोटर्सचे पंच, नेक्सॉन आणि टोयोटाच्या इनोव्हा क्रिस्टा यासह ऑटोमेकर्सच्या सीएनजी हॅचबॅक, सब-कॉम्पॅक्ट SUV आणि MPVचा सहभाग असणार आहे.
CNG स्वस्त आणि मायलेज जास्त :-
पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत CNG कारमुळे प्रदूषण तर कमी होतेच पण त्या लोकांच्या खिशालाही परवडतं, कारण पेट्रोल-डिझेलपेक्षा CNG ही स्वस्त आहे आणि या कारला मायलेजही जास्त मिळतो. जर तुम्ही कॉम्पॅक्ट CNG कार घेण्याचा विचार करत असाल, तर लवकरच लॉन्च होणार्या CNG हॅचबॅक कार्सच्या खास गोष्टी चला जाणून घेऊया…
मारुती सुझुकी बलेनो (Maruti Baleno CNG) :-
मारुती सुझुकी ऑटोमेकर इंडो-जपानी कंपनी आपल्या Arena आणि Nexa प्रॉडक्ट लाइनअपवर CNG मॉडेल्स लॉन्च तयार करण्याची योजना आखली आहे. नवीन मारुती बलेनो CNG येत्या काही महिन्यांत रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहे.1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन या मॉडेलमध्ये फॅक्टरी फिट CNG किट वापरलं जाईल.
गॅसोलीन युनिट 89PS पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. रेग्युलर पेट्रोल मॉडेल 22Km प्रतितास पेक्षा जास्त मायलेजचा दावा करते. बलेनोचे CNG मॉडेल 28 किमी /किलो मायलेज देऊ शकते.
मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Swift CNG) :-
मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या हॅचबॅक कारपैकी एक, स्विफ्ट लवकरच CNG व्हेरियंट मिळणार आहे. Dzire CNG प्रमाणे, मारुती स्विफ्ट CNG 1.2-लिटर ड्युअलजेट K12C पेट्रोल इंजिनसह CNG किटसह येत आहे.
CNG मोडमध्ये, ही हॅचबॅक कार 70bhp ची पीक पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. तर,CNG मॉडेलची पॉवर 11bhp आहे आणि टॉर्क नियमित पेट्रोल इंजिन मॉडेलपेक्षा 18Nm कमी आहे.
टोयोटा ग्लान्झा (Toyota Glanza CNG) :-
2022 Toyota Glanza CNG मॉडेल येत्या काही महिन्यांत लाँच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या पॉवरट्रेन सिस्टममध्ये फॅक्टरी फिट CNG किटसह 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन समाविष्ट असणार आहे.
हे लोअर आणि मिड-स्पेक व्हेरियंटवर ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. Glanza CNG मॉडेल 25 किमी / किलो मायलेज देईल. नव्या CNG हॅचबॅकची लॉन्च तारीख येत्या काही दिवसांत मिळणार आहे.