शेतीशिवार टीम : 22 मार्च 2022 : केंद्र सरकार आणि राज्य सरकार व्यतिरिक्त, अनेक प्रायव्हेट संस्था विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी कार्यक्रम किंवा योजना चालवतात. गुगलसारखी मोठी कंपनी अनेक देशांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम चालवते. तसेच ‘निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीही फोटोग्राफीमध्ये आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रम योजना राबवते. यासाठी अर्ज करून विद्यार्थ्याला 1 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळते.
निकॉन शिष्यवृत्ती योजना / कार्यक्रम काय आहे ? ऑनलाइन अर्ज कसा करावा ? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ? निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रमाशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊयात, त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण लेख नक्की वाचा…
निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रम / योजना काय आहे? (Nikon Scholarship Program 2022-23)
निकॉन इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनी हा शिष्यवृत्ती कार्यक्रम आयोजित करते. फोटोग्राफीमध्ये आवड असलेले 12वी उत्तीर्ण विद्यार्थी Nikon India शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग बनू शकतात. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि फोटोग्राफीमध्ये आपले करिअर करू इच्छितात ते निकॉन स्कॉलरशिप प्रोग्रॅम 2022-23 (Nikon Scholarship 2022-23) साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रमाची उद्दिष्टे :-
फोटोग्राफीशी संबंधित तुम्ही खासगी कोर्स करायला गेलात तर त्याचा अभ्यासक्रम खूपचं महाग आहेत. काही विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर फोटोग्राफीमध्ये करिअर करण्याची इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते या क्षेत्रात पाऊल ठेवू शकत नाहीत.
अशा परिस्थितीत, फोटोग्राफीची आवड असलेल्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने ‘निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ तर्फे निकॉन स्कॉलरशिप प्रोग्रॅम चालवला जातो. 3 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या फोटोग्राफी संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले 12वी उत्तीर्णच विद्यार्थीचं अर्ज करू शकतात…
निकॉन इंडिया प्राइवेट लिमिटेड ने Nikon शिष्यवृत्ती प्रोग्रॅम 2022-23 अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज संबंधित माहिती जारी केली आहे. विद्यार्थी 31 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. निकॉन इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा buddy4study वर नोंदणी करून तुम्ही Nikon Scholarship कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली आहे.
निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022 पात्रता :-
कोणत्याही राज्यात राहणारे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
केवळ तेच विद्यार्थी अर्ज करू शकतील जे 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर 3 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा फोटोग्राफी संबंधित अभ्यासक्रम संबंधित शिक्षण घेत आहे.
तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा सरकारी संस्थेतून फोटोग्राफीचा कोर्स करत असाल तरीही तुम्ही ‘निकॉन स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज करू शकता.
अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
Nikon India Pvt Ltd आणि Buddy4Study कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग बनू शकणार नाहीत.
तुम्ही इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असलात तरीही तुम्ही या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकता आणि शिष्यवृत्ती मिळवू शकता…
Nikon India Scholarship ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-
आधार कार्ड / ओळखपत्र
बारावीची मार्कशीट
फोटोग्राफी कोर्स नावनोंदणी पुरावा (खाजगी / सरकारी)
बँक खाते माहिती
कॅन्सल केलेला चेक
निकॉन शिष्यवृत्ती 2022-23 ऑनलाइन अर्ज / अर्ज फॉर्म :-
अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला buddy4study च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
येथे तुम्हाला ‘Apply Now’ हे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.
वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक करावे लागेल.
विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुम्ही buddy4study वेबसाइटवर नोंदणी प्रक्रिया सहज पूर्ण करू शकाल.
त्यानंतर तुम्ही आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर, तुमचे प्रोफाइल उघडेल.
यानंतर तुम्हाला पुन्हा Apply Now बटणावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
येथे तुम्हाला Start Application बटणावर क्लिक करावे लागेल.
यानंतर, काही माहिती दिल्यानंतर, तुम्हाला Check Your Eligibility वर क्लिक करावे लागेल.
तुमच्या स्क्रीनवर अभिनंदनाचा संदेश येईल, येथे तुम्ही Continue बटणावर क्लिक करा.
पुढील प्रक्रियेत, अर्ज भरण्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक तपशील, कुटुंबातील सदस्यांची माहिती भरावी लागेल.
यानंतर, विनंती केलेल्या सर्व कागदपत्रांची PDF अपलोड करा.
आता तुम्हाला तुमच्या बँकेशी संबंधित माहिती टाकावी लागेल.
पुढील प्रक्रियेत, तुम्हाला तुमची आणि तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
Terms & Conditions वर क्लिक केल्यानंतर Save & Continue वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.